दिल्लीचा चोरटा, नागपूरमध्ये येऊन मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरायचा, असा आला जाळ्यात

जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश मिळले आहे. या गॅंगमधील पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी दिल्लीचा आहे.

दिल्लीचा चोरटा, नागपूरमध्ये येऊन मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरायचा, असा आला जाळ्यात
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 10:09 PM

नागपूर : 29 ऑगस्ट 2023 । जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाईलला रेंज मिळत नसेल तर सगळं काही ठप्प होते अशी सध्याची परिस्थिती. नागपूरकरांना गेले काही महिने या परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. मोबाईलला रेंज येत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली होती. रेंज येत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून येत होत्या. त्यामुळे मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतली होती. या शोध मोहिमेत त्यांना टॉवरमधील बॅटरी चोरी झाल्याचे आढळून आले. या अधिकाऱ्यांनी रीतसर पोलीस तक्रार केली आणि बॅटरी चोरांचा शोध सुरु झाला.

नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जिओचे मोबाईल टॉवर लागले आहेत. मात्र, काही महिने जिओची रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. सततच्या तक्रारीमुळे अधिकारी चक्रावले होते. त्यांनी अखेर मोबाईल टॉवरची तपासणी केली. त्यावेळी त्यांना टॉवरच्या बॅटरी चोरी झाल्याचे लक्षात आले.

हे सुद्धा वाचा

जिओच्या अधिकाऱ्यांनी त्याची पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या चोरट्याचा शोध घेण्यास सुरवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या चोरीची कबुली दिली. पोलिसांनी या टोळीकडून 82 बॅटरी जप्त केल्या असून त्याची किंमत 26 लाख एवढी आहे.

ही टोळी ज्या ठिकाणी जिओचे मोबाईल टॉवर लागले आहे त्या ठिकाणी आधी रेकी करायचे. मग त्या ठिकाणी जाऊन त्या टॉवरमधील बॅटरी चोरी करायचे. यातील एका बॅटरीची किंमत जवळपास 80 ते 90 हजाराच्या घरात आहे. अशा एकूण 82 बॅटरी या टोळीने चोरल्या असून त्याची किंमत 26 ते 27 लाखांच्या घरात आहे.

नागपूर ग्रामीण भागात या टोळीने हैदोस माजविला होता. या गॅंगमधील पाच जणांपैकी एक आरोपी हा दिल्लीचा आहे. त्याचे या गॅंगशी काय कनेक्शन आहे? ही गॅंग बाहेरून येऊन अशा प्रकारे चोरी करते का? त्याचप्रमाणे जर अशा प्रकारे टॉवरच्या बॅटरी चोरी मध्ये त्या ठिकाणी काम करणाऱ्यांचा सहभाग आहे का या सगळ्या बाबीचा शोध आता पोलीस घेत आहेत.

या चोरट्यांची दहशत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र ही टोळी हाती लागत नव्हती. पण आता ही टोळी पोलिसांच्या हाती लागल्याने एक मोठी टोळी बाहेर येण्याची शक्यता नागपूर ग्रामीणचे एसपी विशाल आनंद यांनी वर्तवली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.