‘त्याने’ चक्क पोलीस व्हॅनच पळवली, अजब चोरीची जिल्ह्याभरात चर्चा

चोरटे काय करतील याचा नेम नाही. एका चोरट्याने चक्क पोलीस ठाण्यातच चोरी करण्याची हिंमत दाखवल्याने चोरांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसून येते.

'त्याने' चक्क पोलीस व्हॅनच पळवली, अजब चोरीची जिल्ह्याभरात चर्चा
पोलीस ठाण्यातून पोलीस व्हॅनची चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 10:04 AM

संदीप शिंदे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर / 18 जुलै 2023 : चोरी करण्यासाठी चोरटे काय करतील याचा नेम नाही. सोलापूरमध्ये घडलेल्या घटनांवरुन चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसते. कारण चोरट्याने चक्क पोलीस ठाण्यासमोरुन पोलिसांचीच व्हॅन पळवली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. इरफान शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. इरफान हा पुणे शहरातील हडपसर येथील रहिवासी आहे. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत. मात्र या अजब चोरीची जिल्हाभर चर्चा सुरु आहे. वाढती गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

काय आहे प्रकरण?

आतापर्यंत आपण विविध मौल्यवान वस्तू, दागिने चोरल्याच्या घटना ऐकल्या असतील. पण सोलापूरमध्ये अजब चोरीबी घटना उघडकीस आली आहे. यावेळी चोरट्याने चक्क पोलीस ठाण्यातून चोरी केली. चोराने पोलिसांचीच व्हॅनच पळवून नेली आहे. मद्यधुंद अवस्थेत चोरटा पोलीस ठाण्याजवळ आला आणि व्हॅन घेऊन पळाला. पोलिसांनी तात्काळ चोरट्याचा पाठलाग सुरु केला.

काही अंतरावर जाताच गाडीचा वेग जास्त असल्याने चोरट्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर व्हॅन रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात पलटली. यात व्हॅनसह दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आरोपीला गाडीतून बाहेर काढत अपघात स्थळाहून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.

हे सुद्धा वाचा

कुर्डूवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात चोरी आणि शासकीय वाहनाचे नुसकान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत. मात्र या अजब चोरीच्या गजब कहाणीची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.