Kalyan Theft : लोकलमधून मोबाईल लंपास करणारा सराईत चोरटा गजाआड, पोलिसांनी केली आठ गुन्ह्यांची उकल

ग्रस्त घालत असताना कल्याण लोहमार्ग पोलिसांना स्टेशन परिसरात प्रवाशाच्या बॅगेत हात टाकून मोबाईल लंपास करत असताना किसन परमार रंगेहाथ सापडला.

Kalyan Theft : लोकलमधून मोबाईल लंपास करणारा सराईत चोरटा गजाआड, पोलिसांनी केली आठ गुन्ह्यांची उकल
लोकलमधून मोबाईल लंपास करणारा सराईत चोरटा गजाआडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 12:38 AM

कल्याण : लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल (Mobile) लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी स्टेशन परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 8 महागडे मोबाईल हस्तगत (Seized) केले आहे. किसन परमार असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करुन चौकशी केली असता त्याने 8 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, परमार हा सराईत गुन्हेगार आहे. तो नशा करण्यासाठी मोबाईल चोरी करून मुंबईच्या चोर बाजारात विकत असे. आरोपीने अजून किती ठिकाणी चोरी केली याचा तपास पोलीस करत आहेत.

प्रवाशाच्या बॅगेतून मोबाईल काढताना आरोपीला रंगेहाथ पकडले

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्यांचा माग काढणे सुरू केलं. कल्याण स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांचे गस्त सुरू केले आहे. अशाच प्रकारे ग्रस्त घालत असताना कल्याण लोहमार्ग पोलिसांना स्टेशन परिसरात प्रवाशाच्या बॅगेत हात टाकून मोबाईल लंपास करत असताना किसन परमार रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक दोन नव्हे तर चक्क आठ मोबाईल आढळले. चौकशी दरम्यान हे आठही मोबाईल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता परमारने रेल्वे स्टेशनवर लोकल एक्सप्रेसमध्ये चढता उतरताना प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत कल्याण स्टेशन परिसरात 8 गुन्हे केल्याची कबुली दिली. (A thief who stole a mobile phone from a local was arrested by the Kalyan Railway Police)

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.