रेल्वे स्थानकात प्रवाशाला लुटले, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करण्यात आला. त्यानंतर विकास हंगारके या 20 वर्षीय आरोपीला पोलीसांनी अटक केली. रेल्वे स्थानकात झोपत असताना रात्रीच्या वेळी सावधान रहा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली परीसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अनेकदा प्रवासी रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानक परिसराचा सरा घेतात अन् झोपी जातात. मग चोरटे याच संधीचा फायदा घेतात आणि प्रवाशांना लुटून पसार होतात. कल्याण रेल्वे स्थानकात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात घडली चोरीची घटना
कल्याण रेल्वे स्थानकात पश्चिमेकडील बुकिंग हॉल येथे एक इसम झोपला होता. यावेळी एका चोराने त्याची बॅग लंपास केली. आपली बॅग चोरीला गेलीये हे लक्षात आल्यावर प्रवाशाने कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करण्यात आला. त्यानंतर विकास हंगारके या 20 वर्षीय आरोपीला पोलीसांनी अटक केली. विकास गोरेगावमधील रहिवासी आहे. आरोपीकडून चोरीला गेलेला मु्द्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वपोनि अविनाश आंधळे, सपोनि देशमुख, पोलीस हवालदार नावखेडे, पोलीस हवालदार कुटे, पोलीस नाईक कुटे, पोलीस नाईक विशे, पोलीस नाईक जगताप, पोलीस शिपाई व्हरकट, पोलीस शिपाई केदार, पोलीस शिपाई शेळके रेल्वे स्थानकात झोपत असताना रात्रीच्या वेळी सावधान रहा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या सात संशयितांना अटक
नाशिकमधील नांदूर शिंगोटे येथे घरफोडी करणाऱ्या सात संशयित आरोपींना वावी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून घरफोडीत चोरून नेलेले सोन्याचे एकूण 127 ग्रॅम वजनाचे दागिने, तसेच 8 मोबाईल फोन, 5 मोटर सायकली असा एकूण 9,02,445 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.