माता न तू वैरिणी ! सावत्र आईने साडेतीन वर्षांच्या मुलाला संपवले, कारण ऐकून हैराण व्हाल !

संजय, त्याची दोन मुले, अंतिमादेवी आणि तिचा एक मुलगा असे पाच जण एकत्र गायकवाडवाडी येथे राहत होते.अंतिमादेवी ही तिचा मुलगा आणि दुसऱ्या नवऱ्याची दोन मुलं असे तिन्ही मुलांचा सांभाळती करत होती.

माता न तू वैरिणी ! सावत्र आईने साडेतीन वर्षांच्या मुलाला संपवले, कारण ऐकून हैराण व्हाल !
सावत्र आईने साडेतीन वर्षांच्या मुलाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 3:30 PM

डोंबिवली / सुनील जाधव (प्रतिनिधी) : डोंबिवलीत एका सावत्र आईने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करत त्याची हत्या (Child Murder in Dombivali) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंतिमादेवी संजय जैस्वाल असे या सावत्र आईचे नाव आहे. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलिसांनी (Dombivali Tilak Nagar Police) हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सावत्र आई अंतिमादेवीला पोलिसांनी अटक (Police Arrest Stepmother) केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

जयस्वाल यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते

डोंबिवली पुर्वेकडील पाथर्ली, गायकवाडवाडी येथील सिताबाई निवास येथे राहणाऱ्या संजय जयस्वाल यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. जयस्वाल यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. पत्नीच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी अंतिमादेवी यांच्याशी दुसरा विवाह केला.

आरोपी महिलेचाही हा दुसरा विवाह होता

अंतिमादेवीचे पहिले लग्न झाले होते. मात्र तिचा पती दारु पिऊन खूप त्रास द्यायचा. रोजच्या जाचाला कंटाळून तिने पहिल्या पतीला सोठचिट्ठी देत संजय जयस्वाल याच्याशी दुसरा विवाह केला. अंतिमादेवीलाही पहिल्या पतीपासून तीन मुले आहेत.

हे सुद्धा वाचा

आरोपी महिला सावत्र मुले, स्वतःच्या मुलासह दुसऱ्या पतीसोबत रहायची

संजयचा एक मुलगा त्याच्या नातेवाईकांकडे राहत होता. तर दोन मुले संजयसोबत राहत होती. अंतिमादेवीची दोन मुले पहिल्या नवऱ्याकडे राहत होती. तर एक मुलगा तिच्यासोबत राहत होता.

संजय, त्याची दोन मुले, अंतिमादेवी आणि तिचा एक मुलगा असे पाच जण एकत्र गायकवाडवाडी येथे राहत होते.अंतिमादेवी ही तिचा मुलगा आणि दुसऱ्या नवऱ्याची दोन मुलं असे तिन्ही मुलांचा सांभाळती करत होती.

मयत साडेतीन वर्षाच्या मुलगा सारखा रडायचा, सुसू करायचा

दुसरा नवऱ्याचा साडेतीन वर्षाचा लहान मुलगा नेहमी रडायचा. तसेच बिछान्यावरती सुसू करायचा, यामुळे अंतिमादेवी त्याला नेहमी मारहाण करायची. काल दुपारी तीनच्या सुमारास अशीच घटना घडली.

यावेळी अंतिमादेवीला राग अनावर झाल्याने तिने साडेतीन वर्षाच्या कार्तिकला लाथा बुक्यांनी आणि वायरने बेदम अमानुषपणे मारहाण केली. या जबर मारहाणीत कार्तिक बेशुद्ध पडला. त्याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले गेले.

मारहाणीत जखमी मुलाला रुग्णालयात नेले, मात्र…

परंतु कार्तिकची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मारहाणीत शरीराच्या अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली.

पोलिसांकडून सावत्र आईला अटक

पोलिसांनी आज सकाळी कार्तिकला अमानुषपणे मारहाण करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सावत्र आई अंतिमादेवी हिच्यावर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. या घटनेने डोंबिवलीत एकच खळबळ माजली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.