बेकरीत खेळत होता, खेळता खेळता पीठ मळणी यंत्राजवळ गेला अन्…

तीन वर्षाचा मुलगा घराजवळच्या बेकरीजवळ खेळत होता. खेळता खेळता तो बेकरीत गेला अन् मग पुढे जे घडले त्याने सर्वच हादरले.

बेकरीत खेळत होता, खेळता खेळता पीठ मळणी यंत्राजवळ गेला अन्...
पीठ मळणी यंत्रात अडकल्याने बालकाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 12:20 PM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : घराच्या बाजूला असलेल्या बेकरीत तीन वर्षाचा चिमुकला खेळत होता. खेळता खेळता तो पीठ मळणी यंत्राजवळ गेला. यावेळी यंत्राचे बटण चालू झाले अन् चिमुकला आत अडकला. यात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. नाशिकच्या पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथील हिमालय हाऊस येथे ही घटना घडली. हिमालय बेकरीत ही दुर्दैवी घटना घडली. चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आपलं मूल कुठे खेळत आहे, कुठे जात आहे याकडे पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे.

मशिनजवळ खेळताना बटण सुरु झालं अन्…

पंचवटी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राहणारा तीन वर्षाचा मुलगा रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बेकरीजवळ खेळत होता. यावेळी बेकरीतील कामगार पीठ मळणी यंत्राची सफाई करत होता. मशिनमधील कचरा टाकण्यासाठी कामगार गेला असता चिमुकला मशिनजवळ गेला. तो मशिनवर चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी मशिनच्या बटणावर हात लागल्याने मशिन सुरु झाली आणि मुलगा मशिनच्या पट्ट्यात खेचला गेला.

जखमी मुलाचा उपाचारादरम्यान मृत्यू

मुलाचा आरडाओरडा ऐकून बेकरी कामगार आणि मुलाचे कुटुंबीय धावत आले. मशिन बंद करुन त्यांनी मुलाला बाहेर काढले. मात्र मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याला कुटुंबीय तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.