Chandrapur Tiger : चंद्रपूरमध्ये गोठ्यात वाघ शिरला, वनविभागाकडून सुटकेचे प्रयत्न सुरु

चंद्रपूर जिल्ह्यातही सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आसरा शोधत एक वाघ एका गोठ्यात शिरला. चंद्रपूरमध्ये वरोरा तालुक्यातील चारगाव येथे सायंकाळच्या चार सुमारास एका गोठ्यात हा वाघ शिरला.

Chandrapur Tiger : चंद्रपूरमध्ये गोठ्यात वाघ शिरला, वनविभागाकडून सुटकेचे प्रयत्न सुरु
चंद्रपूरमध्ये गोठ्यात वाघ शिरलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 8:40 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गावातील गोठ्यात वाघ (Tiger) शिरल्याने गावात खळबळ माजली आहे. वरोरा तालुक्यातील चारगाव येथे आज दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान संजय लाखे यांच्या गोठ्यात वाघ शिरला. या भागात मोठा पाऊस (Rain) असल्याने शेतशिवारातून वाघ आसरा शोधण्यासाठी गावात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकांनी आरडाओरडा करताच वाघ गोठ्याच्या पोटमाळ्यावर दडून बसलाय. वनविभागा (Forest Department)चे कर्मचारी गावात दाखल झाले असून वाघाला सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चारगाव येथे गावात वाघ घुसल्याचे कळताच आजूबाजूच्या गावातील लोकं देखील चारगावकडे रवाना झाले. गर्दीला वाघापासून दूर ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

वनविभागाकडून वाघाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

सध्या पावसाने राज्यात हाहाःकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे केवळ जनजीवन विस्कळीत झाले नाही तर वन्यजीव आसरा शोधण्यासाठी इतरत्र पळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आसरा शोधत एक वाघ एका गोठ्यात शिरला. चंद्रपूरमध्ये वरोरा तालुक्यातील चारगाव येथे सायंकाळच्या चार सुमारास एका गोठ्यात हा वाघ शिरला. सदर वाडा गावातील संजय लाखे यांच्या मालकीचा आहे. या घटनेने गावात एकच गोंधळ उडाला आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाने चारगावात धाव घेत वाघाची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या भागात मोठा पाऊस असल्याने शेतशिवारातून वाघ आसरा शोधण्यासाठी गावात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकांनी आरडाओरडा करताच वाघ गोठ्याच्या पोटमाळ्यावर दडून बसला आहे. (A tiger entered a cowshed in Chandrapur and the forest department started trying to get rid of it)

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.