एका नर्सवर डॉक्टरसह जडला तिघांचा जीव, मग तिघांनी मिळून केले असे काही की…

दोन महिन्यांपूर्वी तिघांनाही ही नर्स आपल्याला भुलवित असल्याचे कळाल्याने तिघेही बैचेन झाले होते. त्यानंतर तिघांनी एकत्र येत केले असे काही की...

एका नर्सवर डॉक्टरसह जडला तिघांचा जीव, मग तिघांनी मिळून केले असे काही की...
कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीवर जीवघेणा हल्लाImage Credit source: istockphoto
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 1:40 PM

लखनऊ : प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या एकाशी आणि दुसऱ्याशी सलगी ठेवायची अशा दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्याला त्याचा फटका बसतोच.. परंतू येथे तर एका ट्रेनी नर्सचे तिघांशी प्रेमाचं नातं सुरू होतं…त्यात एका डॉक्टराचाही समावेश होता. अखेर तिघांना या नर्सने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे कळलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर या तिघांनी तिला बागेत बोलावले आणि मग जे घडलं ते भयानकच..

रहीमाबाद येथे रहाणारी 17 वर्षीय ट्रेनी नर्स किशोरी एका खाजगी रूग्णालयात काम करीत होती. तिचे अमित अवस्थी नावाच्या तरूणाबरोबर प्रेमाचं नातं सुरू होतं. काही दिवसानंतर न्यू मेडिप्लस हॉस्पिटलचे डॉक्टर अंकित सिंह देखील तिच्या प्रेमात पडले. नंतर अमितचा मित्र दिनेश मौर्या याच्या देखील संपर्कात ती आली. तिघांच्या सोबत नर्स किशोरी हीच्या प्रेमाच्या आणाभाका सुरू होत्या.

दोन महिन्यांपूर्वी तिघांनाही ही नर्स आपल्याला भुलवित असल्याचे कळाल्याने तिघेही बैचेन झाले. त्यानंतर तिघांनी एकत्र येत आता तिचा काटा काढायचा ठरविला. 10 एप्रिलच्या सायंकाळी साडे पाच वाजता अमितने किशोरीला बागेत बोलावले. येथे तिचा गळा दाबून त्याने तिची हत्या केली आणि मृतदेह रेल्वेच्या ट्रॅक शेजारी फेकला.

अंकीत याच्या फ्लॅटवर थांबली

तपासात असे उघड झाले की नऊ एप्रिलच्या रात्री ट्रेनी नर्स आरोपी अंकीत याच्या फ्लॅटवर थांबली होती. येथे दोन जण आणखी होते. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ड्यूटी केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता जेव्हा ती घरी निघाली तेव्हा तिला अमितने बागेत बोलावले होते. पोलिसांनी जेव्हा आरोपींचे मोबाईल संभाषण तपासले तेव्हा तिघांनी तिच्या हत्येचा कट त्यांनी रचल्याचे स्पष्ट झाले. व्हॉट्सअप चॅटवरुनही या कटाचा खुलासा झाला.

पोलीस ठाण्यात गोंधळ

जेव्हा नर्सचा मृतदेह ट्रॅक शेजारी सापडला तेव्हा पोलीसांनी तिघा आरोपींची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते. मुलीने आत्महत्या केल्याचा फोरेन्सिक अहवाल सांगत होता. परंतू जेव्हा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला तेव्हा हत्या झाल्याचा खुलासा झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फैलावर घेतल्यानंतर पुन्हा नव्याने तपास करुन तिघा आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यात आले. तसेच मुख्य आरोपी अमित याच्या नातलगांनी पोलिसांवर पैसे खाऊन आपल्या मुलाला गोवल्याचा आरोप करीत रहीमाबाद पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. आरोपीच्या आईने बांगड्या फोडून स्वत:ची नस कापण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.