नेत्याची गाडी सिनेमात दाखवतात तशी कंटेनरने फरफटत नेली! थोडक्यात बचावले सपाचे जिल्हा अध्यक्ष, पाहा थरारक व्हिडीओ

Devendra Singh Yadav Accident News : समाजवादी पाटीचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र यादव हे आपल्या कार्यालयातून त्यांच्या ब्रीझा कारने घरी जात असताना ही दुर्घटना घडली

नेत्याची गाडी सिनेमात दाखवतात तशी कंटेनरने फरफटत नेली! थोडक्यात बचावले सपाचे जिल्हा अध्यक्ष, पाहा थरारक व्हिडीओ
उत्तर प्रदेशात भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 2:57 PM

सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे राजकीय नेत्याच्या (Political Leader Car Accident) कारला धडक देत कंटेनरचे अक्षरशः फरफटत नेलं. विशेष या भीषण अपघातामधून राजकीय व्यक्ती आश्चर्यकारकरीत्या बचावलीय. ही घटना घडली उत्तर प्रदेशमधूल मैनपुनरीमध्ये. समाजवादी पाटीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह (Devendra Singh Yadav) हे कारने घरी निघाले होते. वाटेत त्यांच्या कारला एका भरधाव ट्रकने ठोकर दिली आणि अक्षरशः कारला फरफटत रस्त्यावरुन 500 मीटर दूरवर ट्रक खेचत घेऊन गेला. थरारक अपघातात दोघे बाईकस्वारही गाडी खाली येता येता राहिले. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यातही (Up Accident Video) कैद झाली आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये हा अपघात किती भीषण होता, हे ठळकपणे अधोरेखित झालंय. दरम्यान, पोलिसांनी या अपघातप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय. तसंच सपा जिल्हा अध्यक्ष देवेंद्र सिंह यादव यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली. स्थानिक लोकांनी वेळीच प्रसंगावनधान राखत मोठा अपघात होता होता रोखलाय.

पाहा व्हिडीओ :

समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र सिंह यादव हे समाजवादी पार्टा कार्यालयाहून आपल्या घरी जायला निघाले होते. करहल या आपल्या निवासस्थानी कारमधून जात असता त्यांच्या गाडीचा अपघात झाला. शहरातील माधव गेस्ट हाऊससमोर त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. मागून कारला बसलेल्या धडकेनंतर ट्रक चालकाने गाडी न थांबवता कारला तब्बल 500 मीटर दूरवर फरफटत नेलं होतं.

दरम्यान, चालकाला यावेळी रोखण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला असता चालकालाने लोकांनीही चिरड्याचा प्रयत्न केला. या थराराक घटनाप्रसंगी एकच गोंधळ रस्त्यावर उडाला होता. दोघा दुचाकीस्वारांना या भरधाव ट्रकच्या चालकाला आवर घालण्यासाठी बाईक पुढे आणली होती. पण मग्रूर ट्रक चालकानं जराही तमा न बाळगता दुचाकीस्वारांनाही चिरड्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी हा सगळा प्रकार पाहून ट्रकच्या मागून धाव घेतली. आरडाओरडा केला. त्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने अखेर ब्रेकवर पाय ठेवला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करत ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून चालकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय.

समाजवादी पाटीचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र यादव हे आपल्या कार्यालयातून त्यांच्या ब्रीझा कारने घरी जात असताना ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मैनपुरीचे एसपी कमलेश दीक्षित यांनी दिली आहे. हरयाणा रजिस्ट्रर नंबरच्या ट्रकने ही धडक दिली असून या ट्रकच्या चालकाचं नाव विनय यादव असून सध्या पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जाते. हा हत्येचा कट तर नव्हता ना, अशी शंका आता उपस्थित केली जातेय. दरम्यान, थोडक्यात एवढ्या भीषण अपघातातून देवेंद्र यादव सुखरुप बचावलेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.