ओव्हरटेक करताना वाद झाला, ट्रक चालकाने कारला 500 मीटर फरफटत नेले

गाडीतील प्रवाशांनी विरोध केल्यावर चालकाने पुन्हा ट्रकमध्ये बसून ट्रक सुरू केला. यानंतर त्यांनी पुन्हा कारला धडक दिली. त्याचा राग इथेच थांबला नाही, धडकल्यानंतर ट्रक चालकाने कार सुमारे 500 मीटरपर्यंत फरफटत नेली.

ओव्हरटेक करताना वाद झाला, ट्रक चालकाने कारला 500 मीटर फरफटत नेले
ट्रकने कारला फरफटत नेलेImage Credit source: Social
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 8:54 PM

शाहजहापूर : ओव्हरटेक करताना झालेल्या वादातून ट्रक चालकाने कारला धडक देत सुमारे 500 मीटर फरफटत नेल्याची घटना शाहजहापूर येथे घडली आहे. सुभाष चौक ते चौकी ट्रक चालक कारला फरफटत घेऊन गेला. या घटनेत कारमधील सर्व जण सुदैवाने बचावले आहेत. घटनेवेळी ट्रक चालक दारुच्या नशेत असल्याचे कळते. ही घटना उघड होताच सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

रोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौकाजवळ बुधवारी रात्री उशिरा एका भरधाव ट्रकने कारला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक आणि कारचालक यांच्यात वाद झाला.

गाडीतील प्रवाशांनी विरोध केल्यावर चालकाने पुन्हा ट्रकमध्ये बसून ट्रक सुरू केला. यानंतर त्यांनी पुन्हा कारला धडक दिली. त्याचा राग इथेच थांबला नाही, धडकल्यानंतर ट्रक चालकाने कार सुमारे 500 मीटरपर्यंत फरफटत नेली.

हे सुद्धा वाचा

आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले

कारमधील चालक आणि इतर लोक सुदैवाने बचावले आहेत. आरडाओरडा ऐकून पोलीस चौकीत तैनात असलेले हवालदार घटनास्थळी पोहोचले. आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी ट्रक मालकाला घटनास्थळी बोलावून चौकशी केली.

दिल्लीत गाडीच्या बोनेटवर तरुणाला फरफटत नेले

दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात हॉर्नच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. रागाच्या भरात कारमधील तरुणाने एका व्यक्तीला धडक दिली. यानंतर त्याने तरुणाला बोनेटवर अर्धा किलोमीटर नेले. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.