मेट्रोत 2 व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडीओ तुफान व्हायरल, अखेर…
सोशल मीडियावर कायमच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यापैकी अनेक व्हिडीओ हे रेल्वे संबंधित असतात. मुळात म्हणजे सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ मेट्रोमधील आहे आणि दोन युवक तुफान मारहाण करताना या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहे.
गाझियाबाद, दिल्ली एनसीआर येथील मेट्रोतील हा व्हिसोशल मीडियावर कायमच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यापैकी अनेक व्हिडीओ हे रेल्वे संबंधित असतात. मुळात म्हणजे सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ मेट्रोमधील आहे आणि दोन युवक तुफान मारहाण करताना या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहे.डीओ आहे. मारहाण करणारा एक व्यक्ती हा हापूर क्राइम ब्रँचमधील जवान आहे. यावेळी त्याने आपली ओळख समोरच्या व्यक्तीला सांगितली. मात्र, तो थेट म्हणाला की, तू कमिश्नर तर नाहीये ना? यानंतर यांच्यातील वाद अधिकच वाढला आणि क्राइम ब्रँचचा जवान असल्याचे सांगणाऱ्या या व्यक्तीने दुसऱ्या तरुणाला मारहाण करून मेट्रोच्या बाहेर काढले.
गाजियाबाद मेट्रो में सीट को लेकर चले लात-घूंसे pic.twitter.com/tnreZ2nME1
— Priya singh (@priyarajputlive) August 23, 2024
कॉलर पकडून त्याला स्टेशनबाहेर काढले आणि आपल्या खासगी कारमध्ये त्याला घेऊन गेला. आता तोच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. एका यूजरने गाझियाबाद मेट्रोमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिण्यात आले की, दिल्लीहून गाझियाबादच्या दिशेने येणाऱ्या मेट्रोमध्ये हा वाद झाला होता. जागेवर बसण्यावरून या वादाला सुरूवात झाली. अगदी छोट्या कारणावरून या वादाला सुरूवात झाली. मात्र, पुढे हा वाद वाढतच गेल्याचे बघायला मिळाले. या दोन व्यक्तींमधील वाद वाढत असल्याचे लक्षात येताच, त्यांच्या आजूबाजुला बसलेले लोक हे उठून गेल्याचे देखील बघायला मिळाले. हेच नाही तर यांच्यातील वाद वाढत असल्याचे बघून काही लोक यांचे भांडणे सोडवण्यास आल्याचेही बघायला मिळतंय.
पुढे हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला की, हा वाद मिटला याबद्दल अजून काही अपडेट मिळू शकले नाहीये. मात्र, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय नक्कीच ठरलाय. मात्र, या वादामध्ये नक्कीच चूक कोण आहे बरोबर कोण हे अजूनही कळू शकले नाहीये. मात्र, हा वाद बसण्यावरून झाल्याचेही सांगितले जातंय.