अंडे खाल्ले म्हणून दोन वेटरमध्ये वाद, वाद विकोपाला गेला अन्…

क्षुल्लक कारणातून दोन वेटरमध्ये वाद झाला. मग या वादातून पुढे जे घडलं ते भयंकर. एकाच दिवशी घडलेल्या तिहेरी घटनांनी जिल्हा हादरला.

अंडे खाल्ले म्हणून दोन वेटरमध्ये वाद, वाद विकोपाला गेला अन्...
अंडे खाण्यावरुन झालेल्या वादातून वेटरची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 10:20 AM

सांगली : दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस येऊन 24 तास उलटत नाहीत तोच तिसरी घटना उघडकीस आली आहे. अंडे खाण्यावरुन झालेल्या वादातून एका वेटरने दुसऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा बनातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी कवठेमहंकाळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुरेश कडीमाने असे मयत वेटरचे नाव आहे. प्रशांत ओबे असे आरोपीचे नाव आहे. मारहाणीनंतर जखमीला रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अंडे खाल्ले म्हणून जीवघेणी मारहाण

सुरेश कडीमाने हा वेटर म्हणून तीन महिन्यांपूर्वी आरेवाडीतील हॉटेलमध्ये कामासाठी आला होता, तर प्रशांत ओबे हा तीन दिवसांपासून कामांवर आला होता. मंगळवारी रात्री पार्टी होती. त्या पार्टीला जेवण देत असताना सुरेश कडीमाने याने अंडे खायला घेतले. यावरून प्रशांत ओबे याने दारूच्या नशेत कडीमाने याच्या डोक्यात वार केला. त्यात कडीमाने गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत कडीमाने याला ढालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

तिहेरी हत्याकांडने जिल्हा हादरला

सांगली जिल्ह्यात काल एकाच दिवशी तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. मिरज तालुक्यात दोन तर कवठेमहांकाळ तालुक्यात एकाचा खून झाला. एकाच दिवशी आणि लगतच्या तालुक्यात तीन खुनाच्या घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे. मिरज तालुक्यातील एरंडोली गावी पत्नीने पतीचा चाकूने भोसकून खून केला. बेडग गावी मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रकार घडला. कवठेमहांकाळ तालुक्यातील बिरोबा बनाच्या हॉटेलमध्ये वेटरनेच किरकोळ कारणातून वेटरची हत्या केली.

हे सुद्धा वाचा

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.