पतीला लोकेशन विचारत प्रियकराला पाठवले, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला ‘असे’ दूर केले
पारुलने पतीला फोन करुन त्याचे लोकेशन विचारले. मग पतीच्या लोकेशनची माहिती प्रियकर गोपाळला दिली. संजय जेव्हा रात्री कामावरुन घरी परतत होता, तेव्हा गोपाळने त्याला रस्त्यात अडवून त्याच्याकडे जिमखान्यापर्यंत लिफ्ट मागितली.
पलवल : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना हरियाणातील पलवलमध्ये उघडकीस आली आहे. हत्येनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. संजय गौतम ऊर्फ गुड्डू असे मयत व्यक्तीचे नाव असून, तो एका डिलिव्हरी कंपनीत काम करत होता. पारुल संजय गौतम आणि गोपाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री हत्येची ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पारुल आणि गोपाळ यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. पारुलचा पती संजय एका फूड डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. संजयला दोन मुले आहेत. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता संजय नेहमीप्रमाणे कामावर गेला.
त्यानंतर रात्री 10 वाजता संजयच्या वडिलांना त्यांचा मुलगा हुड्डा सेक्टर 12 मध्ये मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्याच्यावर कुणीतरी गोळी झाडली होती. संजय वडिलांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत हत्येचा तपास सुरु केला.
चौकशीत पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली
पोलिसांनी संजयच्या पत्नीसह त्याचे मित्र, कुटुंबीय सर्वांची चौकशी केली. पत्नीची चौकशी केली असता पोलिसांना तिच्या बोलण्यावर संशय आला. पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
आपले गोपाळसोबत प्रेमसंबंध होते. यात संबंधात आपला पती संजय अडथळा बनत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पारुलने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी पारुल आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
‘अशी’ केली हत्या
पारुलने पतीला फोन करुन त्याचे लोकेशन विचारले. मग पतीच्या लोकेशनची माहिती प्रियकर गोपाळला दिली. संजय जेव्हा रात्री कामावरुन घरी परतत होता, तेव्हा गोपाळने त्याला रस्त्यात अडवून त्याच्याकडे जिमखान्यापर्यंत लिफ्ट मागितली.
जिमखान्याजवळ पोहचताच गोपाळने संजयवर गोळी झाडून त्याची हत्या केली. यानंतर पोलिसांनी गोपाळला अटक करत त्याची चौकशी केली असता त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.