पार्टीत दोघा मित्रांमध्ये वाद झाला, वाद विकोपाला गेला अन् मित्राने थेट…
दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघे जण दारुची पार्टी करत होते. अचानक दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पुढे जे घडलं ते भयंकर होतं.

कोटा : पार्टीत झालेल्या किरकोळ वादातून पत्नीनेच मित्राच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री राजस्थानमधील कोटा येथे घडली. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी एमबीएस रुग्णालयात पाठवला. गोविंद असे मयत पतीचे नाव आहे, तर लक्ष्मी आणि सुनील अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. कोटाच्या अनंतपुरा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या मुंबई योजना परिसरात ही घटना घडली.
दोघेही एकमेकांचे खास मित्र, पण मैत्रीत अनैतिक संबंध आले अन्…
गोविंद आणि सुनील एकमेकांचे खास मित्र होते. दोघेही सतत एकत्रच असायचे. ते सर्वांना आपण भाऊच असल्याचे सांगायचे. मात्र यादरम्यान लक्ष्मी आणि सुनील यांच्यात जवळीक निर्माण झाली. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरु होते. गोविंद आणि सुनील शनिवारी रात्री दारू पार्टी करत होते. लक्ष्मीही त्याच्या जवळच बसली होती. यावेळी गोविंद आणि सुनील यांच्यात काही कारणातून वाद झाला.
पार्टीत झालेल्या वादातून पत्नीची हत्या
वाद इतका विकोपाला गेला की, लक्ष्मीने तिचा प्रियकर सुनीलच्या मदतीने तिच्याच पतीची डोक्यात हातोड्याने वार करून हत्या केली. त्यानंतर गोविंदचा रक्ताने माखलेला मृतदेह तेथेच टाकून दोघेही पळून गेले. शेजाऱ्यांना घटनेची चाहूल लागताच त्यांनी अनंतपुरा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करून तेथून पुरावेही गोळा केले. पोलीस गोविंद आणि सुनील यांच्याबाबत अधिक माहिती गोळा करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत. मात्र त्यांना अद्याप कोणताही सुगावा लागू शकलेला नाही.