पाच वर्षांनी पुन्हा तीच पुनरावृत्ती, तीच विहिर, तीच घटना; असे काय घडले ज्याने संपूर्ण जिल्हा हादरला

पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये अशीच घटना या कुटुंबात घडली होती. बाबासाहेब काशीद नामक व्यक्तीच्या पहिल्या पत्नीनेही दोन मुलांसह याच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती.

पाच वर्षांनी पुन्हा तीच पुनरावृत्ती, तीच विहिर, तीच घटना; असे काय घडले ज्याने संपूर्ण जिल्हा हादरला
पाच वर्षांनी पुन्हा तीच पुनरावृत्तीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 3:32 PM

सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर : एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील बार्शी (Barshi Solapur) तालुक्यातल्या कुसंबळ गावात घडली आहे. अनुराधा काशीद असे मयत महिलेचे नाव आहे. महिलेने असे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पांगरी पोलिसात (Pangari Police Barshi) घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

पाच वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीनेही केली होती आत्महत्या

पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये अशीच घटना या कुटुंबात घडली होती. बाबासाहेब काशीद नामक व्यक्तीच्या पहिल्या पत्नीनेही दोन मुलांसह याच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा त्याच विहिरीत बाबासाहेबच्या दुसऱ्या पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

दोन्ही पत्नींची, मुलींची नावेही तीच

विशेष म्हणजे बाबासाहेबच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीचे नावही सेम आहे. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मयत मुलीचे आणि दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मयत मुलींची नावही तेच आहे. शेतातील ती विहिरही तीच आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्या पत्नीने दोन्ही मुलींना कमरेला साडीने बांधून शेतातील विहिरीत आत्महत्या केली होती. त्यानंतर बाबासाहेब काशीदवर कौटुंबिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

पहिल्या पत्नी आणि मुलींच्या मृत्यूनंतर बाबासाहेबने 2019 मध्ये रोहिणी उर्फ अनुराधा हिच्याशी लग्न केले. मात्र दुसरी पत्नी अनुराधानेही दोन मुलांसह त्याच विहिरीत शुक्रवारी उडी घेत आपले जीवन संपवले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.