पत्नी सारखी मोबाईलवर बिझी रहायची, संतापलेल्या पतीने जे केले त्यानंतर नाराज महिलेने थेट आयुष्यच संपवले !

दररोजच्या वादातून पती पिंटूने पत्नीला मोबाईल वापरण्यास मनाई केली. यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणातून पतीने पत्नीचा मोबाईल तोडला.

पत्नी सारखी मोबाईलवर बिझी रहायची, संतापलेल्या पतीने जे केले त्यानंतर नाराज महिलेने थेट आयुष्यच संपवले !
मोबाईलवरुन झालेल्या वादातून पत्नीने स्वतःला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 2:10 PM

पलामू : आजच्या आधुनिक जीवनात मोबाईल आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. तथापि मोबाईलचे चांगले आणि वाईट दोन्ही फायदे आहेत. कोरोनामुळे मोबाईलचा अधिक वापर होऊ लागला आहे. ऑनलाईन स्टडी, वर्क फ्रॉम होम या कारणांमुळे मोबाईलचा वापर अधिक वाढला. मात्र याचा परिणाम म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच मोबाईल अधिक अधीन झाले. मोबाईलच्या अतिवापरामुळे संसारातही भांडण होऊ लागली आहेत. अति मोबाईलचा वापर करण्यास मनाई केली तो अहंकाराचा प्रश्न बनला आहे. अशीच एक घटना झारखंडमधील पलामू येथे उघडकीस आली आहे. मोबाईलवरुन झालेल्या वादातून पतीने मोबाईल तोडला म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

पती सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहायची

पलामूमधील झूरहीटोला येथे पिंटू चौधरी आपली पत्नी चिंतादेवी विनयसोबत राहतो. चिंतादेवीला मोबाईलचे अत्याधिक व्यसन होते. ती सतत मोबाईलवर व्यस्त राहत होती. या कारणावरुन पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे.

पतीने मोबाईल तोडल्याने नाराज पत्नीने केली आत्महत्या

दररोजच्या वादातून पती पिंटूने पत्नीला मोबाईल वापरण्यास मनाई केली. यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणातून पतीने पत्नीचा मोबाईल तोडला. पतीने मोबाईल तोडल्यामुळे नाराज झालेल्या पत्नीने खोलीत जाऊन साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

हे सुद्धा वाचा

रेहला पोलिसात घटनेची नोंद

याबाबत रेहला पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी पतीसह सर्व कुटुंबीयांची चौकशी करत घटनेची नोंद केली आहे.

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. एका मोबाईलमुळे महिलेने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.