या महिलेची अशी काय चूक झाली, की तिला ही शिक्षा मिळाली
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वैभव लॉजसमोर घडली आहे.
टिटवाळा : अज्ञात कारणावरुन एका महिलेला काही महिलांनी मिळून बेदम चोपल्याची (Women Beating) धक्कादायक घटना टिटवाळा (Titwala) परिसरात उघडकीस आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. मात्र ही महिला कोण आहे?, तिला मारहाण का करणाऱ्या महिला कोण? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत तक्रार करण्यास कुणी पुढे आले नसल्याने कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
सकाळी सातच्या सुमारास घडली घटना
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वैभव लॉजसमोर घडली आहे. महिलांचे भांडण आणि हाणामारी पाहून उपस्थित नागरिकांनी मध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला ऐकायला तयार नव्हत्या.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये सर्व महिला पीडित महिलेला दांडक्याने मारहाण करीत आहेत. महिलेला इतकी बेदम मारहाण करण्यात आली होती की, यात तिचे कपडे देखील फाटले होते. मारहाणीची संपूर्ण घटना तेथून चाललेल्या एका नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केली. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हिडिओवरुन महिलांचा शोध सुरु
या मारहाण प्रकरणी अद्याप कुणी तक्रार दाखल केली नाही. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मात्र व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या आणि पीडित महिला कोण आहे? या महिला मारहाण का करत होत्या? याचा शोध पोलीस घेत आहेत.
पनवेल लोकलमध्येही मारहाणीची घटना
सीटवरुन झालेल्या वादातून पनवेल लोकलमध्येही महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिला पोलिसालाही महिलांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत एका महिलेसह पोलीसही जखमी झाली आहे.