पतीला सोडून दिरासोबत गेली, नातेवाईकांनी जेवायला आमंत्रित केले मग थेट…

पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर महिलेने दिराशी दुसरा विवाह केला. पतीच्या भावाने दोघांना जेवायला घरी बोलावले. मग त्यानंतर महिला परतलीच नाही.

पतीला सोडून दिरासोबत गेली, नातेवाईकांनी जेवायला आमंत्रित केले मग थेट...
कर्नाटकात रेल्वे स्थानकात महिलेचा मृतदेह आढळलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 3:01 PM

बंगळुरु : कर्नाटकातील विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ड्रममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कमल, तनवीर आणि साकिब अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य पाच आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मृत महिलेचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने दिराशी दुसरा विवाह केला होता. तमन्ना असे मयत महिलेचे नाव आहे.

पहिल्या पतीला तलाक देऊन दिराशी लग्न केले

तमन्नाचे पहिला पती अफरोजसोबत वाद होते. या वादाला कंटाळून तिने अफरोजला तलाक दिला. यानंतर अफरोजचा चुलत भाऊ इंतिखाबशी तिने दुसरा विवाह केला. यावरुन इंतिखाब आणि कुटुंबातील भावांसोबत मतभेद होते. इंतिखाबचा एक नवाब हा बंगळुरुत नोकरी करतो. त्याने तमन्ना आणि इंतखाबला 12 मार्च रोजी कलसीपल्या येथील आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार ते दोघे त्याच्या घरी जेवायला गेले.

हत्या करुन मृतदेह रेल्वे स्थानक परिसरात फेकला

जेवण झाल्यावर त्यांच्यात भांडण झाले. आरोपी नवाबने इंतखाबला घरातून जाण्यास सांगितले आणि तमन्नाला बिहारला परत पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी घरी 8 लोक होते, त्यामुळे असहाय इंतखाब आपल्या पत्नीला सोडून घरी परतला. त्यानंतर आरोपींनी तमन्नाचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. मग मृतदेह एका ड्रममध्ये ठेवून बिहारला पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

आरोपींनी एम विश्वेश्वरय्या टर्मिनल रेल्वे स्थानकाजवळ एका ड्रममध्ये महिलेचा मृतदेह ठेवला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांना पकडण्यात आले आहे. हे सर्वजण बिहारमधील असून, अन्य पाच संशयित अद्याप बेपत्ता आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.