पत्नी करत होती शिफ्ट ड्युटी, पतीला वाटले कुणासोबत तरी लफडं सुरुंय; संशयातून उचलले टोकाचे पाऊल

आरोपी देवेंद्रची पत्नी लिना ही एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिच्या कामाची वेळ नेहमी बदलत असायची. याच शेड्युलवरून देवेंद्रचे लीनासोबत वारंवार भांडण व्हायचे.

पत्नी करत होती शिफ्ट ड्युटी, पतीला वाटले कुणासोबत तरी लफडं सुरुंय; संशयातून उचलले टोकाचे पाऊल
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 6:53 PM

बडवाणी : विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून नोकरी करणाऱ्या महिलेला प्राण गमवावा लागल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. पत्नी दिवस-रात्र कधीही ड्युटीवर जाते. यामागे काहीतरी वाईट कारण असू शकेल, अशी शंका पतीच्या मनात वारंवार डोकावत होती. याच विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. बडवाणी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ही महिला काम करत होती. हॉस्पिटलच्या कामानिमित्त तिला अधूनमधून शहराबाहेरही जावे लागायचे. तिच्या याच शेड्युलवरून पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली होती. हा संशय अखेर पत्नीच्या जीवावर बेतला. पतीने कुऱ्हाडीने मानेवर वार करून तिची हत्या केली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री उशिरा घडली धक्कादायक घटना

शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. उपलब्ध पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत आणखी कुठल्या कारणावरून वाद व्हायचे का?, तसेच या प्रकरणात गुन्ह्यासाठी आणखी कोणी मदत केली आहे का?, याचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरु आहे. देवेंद्र गुर्जर असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

पत्नीच्या सततच्या नाईट ड्युटीमुळे वाद

आरोपी देवेंद्रची पत्नी लिना ही एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिच्या कामाची वेळ नेहमी बदलत असायची. याच शेड्युलवरून देवेंद्रचे लीनासोबत वारंवार भांडण व्हायचे. लीना अनेकदा नाईट शिफ्टच्या ड्युटीला जायची. तसेच अधूनमधून शहराबाहेर जायला लागायचे.

यावरून देवेंद्र हा लीनाच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा. लिना ही त्याच्या दाव्याचे वारंवार खंडन करायची. मात्र देवेंद्रला तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे पत्नीला काहीही करून जीवे मारायचे असा प्लान देवेंद्रने केला. अखेर शनिवारी मध्यरात्री पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिला आपल्या आयुष्यातून कायमचे दूर केले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.