मंदिरात जातो सांगून घरुन गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही, मग थेट…

वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मंदिरात दर्शनासाठी घरुन गेला तो परत आलाच नाही. काळजीने पत्नी शोधायला गेली तर धक्कादायक दृश्य समोर आलं.

मंदिरात जातो सांगून घरुन गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही, मग थेट...
नाशिकमध्ये अज्ञात कारणातून तरुणाने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 11:53 AM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : अज्ञात कारणातून तरुण अभियंत्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. संदीप नाना सहाणे असे मयत अभियंत्याचे नाव आहे. संदीपचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. संदीप एमआयडीसीत कामाला होता. तर पत्नीही पुण्यातील एका कंपनीत कामाला होती. मात्र ती घरुनच काम करायची. दरम्यान, संदीपने गावठी कुठून आणला?, त्याने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंदिरात जातो सांगत घरातून गेला

नाशिकरोड जवळील पळसे येथील संदीप सहाणे हा बुधवारी सकाळी महादेव मंदिरात दर्शन घेऊन येतो, असे पत्नीला सांगून गेला. मात्र खूप वेळ झाला तरी तो परतलाच नाही. त्याची पत्नी सतत त्याला फोन करत होती, मात्र तो प्रतिसाद देत नव्हता. तिने जवळच राहणाऱ्या नातेवाईकाला बोलावले आणि दोघेही संदीपला शोधायला गेले.

घरी परतला नाही म्हणून पत्नीला पहायला गेली तर…

संदीप पत्नी त्याच्या नातेवाईकासह मंदिराजवळ पोहचली असता तिथे त्याची बाईक दिसली. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

हे सुद्धा वाचा

दरम्यान संदीपने जीवन का संपवले याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. संदीपचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघांचा वेगवेगळ्या ठिकाणी विवाह झाला. यामुळे तो अस्वस्थ होता. यातून त्याने जीवन संपवल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सत्य बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.