महिला डॉक्टरच्या प्रेमात वेडा झाला रुग्ण, प्रकरण उघडकीस येताच तरुणासोबत केले असे
कानपूरमधील हॅलट रुग्णालयात उपाचारासाठी आलेला एक तरुण चक्क रुग्णालयातील एका ज्युनिअर डॉक्टरच्या प्रेमात पडला. डॉक्टरला पाहण्यासाठी रुग्ण रोज आजारी पडायचा आणि रुग्णालयात जायचा.
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एकतर्फी प्रेमाचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. महिला डॉक्टरच्या प्रेमात पडणे एका रुग्णाला चांगलेच महागात पडले आहे. डॉक्टरच्या तक्रारीनंतर रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कानपूरमधील हॅलट रुग्णालयात ही घटना घडली आहे.
रुग्णालयात उपचारासाठी आला अन् डॉक्टरच्या प्रेमात पडला
कानपूरमधील हॅलट रुग्णालयात उपचारासाठी आलेला एक तरुण चक्क रुग्णालयातील एका ज्युनिअर डॉक्टरच्या प्रेमात पडला. डॉक्टरला पाहण्यासाठी रुग्ण रोज आजारी पडायचा आणि रुग्णालयात जायचा.
तौहीद नामक हा तरुण 15 दिवसांपूर्वी आजारी पडला होता. त्यामुळे तो इलाज करण्यासाठी कानपूरमधील हॅलट रुग्णालयात गेला होता. यावेळी सदर ज्युनिअर डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले. यानंतर तो ज्युनिअर डॉक्टरच्या प्रेमात पडला.
डॉक्टरला पाहण्यासाठी दररोज रुग्णालयात जायचा
डॉक्टरला पाहण्यासाठी तो दररोज रुग्णालयात जाऊ लागला. सदर डॉक्टरची ज्या वॉर्डला ड्युटी असेल त्या वॉर्डमध्ये तो पेशंट बनून जायचा. कधी कधी तो वेगवेगळ्या नावाने केस पेपर बनवायचा.
ओपीडीमध्ये ज्युनिअर डॉक्टर ड्युटीवर न दिसल्याने त्याने इतर डॉक्टरांकडे त्यांच्याबाबत विचारणा केली. तसेच सतत 15 दिवस हे घडत असल्याने डॉक्टरलाही संशय आला. ही बाब सदर डॉक्टरला समजताच तिने वरिष्ठांकडे याबाबत तक्रार दिली.
सुरक्षारक्षकांनी बेदम चोपले
यानंतर रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून मारहाण केली. पकडल्यानंतर तरुणाने औषध घेण्यासाठी गेलो होतो, आता पुन्हा जाणार नाही, असे स्पष्ट केले. कनिष्ठ डॉक्टरच्या तक्रारीवरून स्वरूप नगर पोलिसांनी तौहीदविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.