Karad Youth Death : फसवणूक झाल्याचे स्टेटस ठेवून युवकाने संपवले जीवन, नेमके काय घडले?

प्रदीपने वेगवेगळी कारणे सांगून वारंवार पैशाची मागणी केली. दयानंदच्या कुटुंबियांनी त्याच्या सांगण्यानुसार वेळोवेळी त्याला तब्बल 9 लाख रुपये दिले. मात्र, तरीही भरतीबाबत तो कारणे सांगत होता.

Karad Youth Death : फसवणूक झाल्याचे स्टेटस ठेवून युवकाने संपवले जीवन, नेमके काय घडले?
सैन्य भरतीच्या नावे तरुणाची फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 3:08 PM

कराड / दिनकर थोरात (प्रतिनिधी) : रक्ताच्या नात्यानेच दगा दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कराडमध्ये उघडकीस आली आहे. कराड तालुक्यातील कोळे येथे ही घटना घडली. दयानंद बाबुराव काळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दयानंदच्या चुलतभावानेच त्याची आर्थिक फसवणूक केली. सैन्यात भरती करतो असे सांगत दयानंदकडून तब्बल 9 लाख रुपये चुलतभावाने उकळले. मात्र नोकरी मिळाली नाही. यामुळे नैराश्य आल्याने दयानंदने फसवणूक झाल्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत जीवन संपवले. दयानंदच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चुलत भावानेच केली आर्थिक फसवणूक

सैन्य दलात भरती करण्याचे अमिष दाखवून चुलत भावानेच 9 लाखाची फसवणूक केल्यामुळे नैराश्येत गेलेल्या युवकाने व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोळे येथे घडली. प्रकरणी सैन्यदलात असलेल्या चुलत भावावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप काळेवर गुन्हा दाखल

याप्रकरणी प्रदीप विठ्ठल काळे याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळे येथील दयानंद याचा चुलत भाऊ प्रदीप काळे हा 2017 साली सैन्य दलात भरती झाला. त्यावेळी दयानंद पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत होता.

हे सुद्धा वाचा

मात्र, सैन्य दलात असलेल्या चुलत भाऊ प्रदीप काळे याने दयानंदला सैन्यदलात भरती करतो, असे सांगितले. त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दयानंदच्या कुटुंबियांनी प्रदीपला पैसे दिले. 7 जुलै 2022 रोजी प्रदीपने दयानंदच्या नावासह निवड यादी मोबाईलवर पाठवली.

तसेच भरतीसाठी आणखी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे कुटुंबियांनी 90 हजार रुपये ऑनलाईन पाठवले. दयानंद सैन्य दलात भरती होण्याच्या आनंदात होता. तसेच तो प्रदीपला फोन करुन भरती कधी होणार, याबाबत विचारणाही करीत होता.

पैसे घेऊनही भरती होत नव्हता

प्रदीपने वेगवेगळी कारणे सांगून वारंवार पैशाची मागणी केली. दयानंदच्या कुटुंबियांनी त्याच्या सांगण्यानुसार वेळोवेळी त्याला तब्बल 9 लाख रुपये दिले. मात्र, तरीही भरतीबाबत तो कारणे सांगत होता.

3 ऑगस्ट 2022 रोजी प्रदीप त्याच्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी गावी आला असताना दयानंदच्या कुटुंबियांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी माझी अलाहाबादवरुन जम्मू काश्मिरला बदली झाली आहे, थोडे थांबा, असे प्रदीपने त्यांना सांगितले.

दरम्यान, वारंवार विचारणा करुनही प्रदीप भरतीबाबत उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे दयानंदचा स्वभाव चिडचिडा बनला होता. कुटुंबीय त्याची समजूत घालत होते. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

29 नोव्हेंबर 2022 रोजी भरतीबाबत विचारणा केल्यामुळे दयानंद आणि प्रदीपचा वाद झाला. दयानंदने पैसे परत मागितल्यावर प्रदीपने 2 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच त्यानंतर प्रदीप पैशाबाबत आणि भरतीबाबत काहीही बोलला नाही.

व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आत्महत्या

27 जानेवारी 2023 रोजी दयानंदने प्रदीपकडे पुन्हा पैशाची मागणी केली. मात्र, त्याने वाद घालून पैसे देणार नाही, असे सांगितले. त्यामुळे हताश झालेल्या दयानंदने 28 जानेवारी रोजी रात्री गावानजीकच्या बनवटी नावच्या शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत मृत दयानंदचा भाऊ शिवानंद काळे याने दिलेल्या फिर्यादीवरुन प्रदीप काळे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दयानंदने गळफास घेतल्याचे त्याच्या घरच्यांना 29 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता समजलं. कुटुंबीयांनी त्याठिकाणी जाऊन मृतदेह पाहिला पोलिसांनी मृतदेहाची उतरणीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

अंत्यविधी झाल्यानंतर कुटुंबीयांनी दयानंद व्हाट्सअपचा स्टेटस पाहिला. त्यावेळी प्रदीप काळे याने मला फसवलं आहे. गावातील अन्य मुलांनाही त्याने अमिष दाखवलं आहे. मी टोकाचे पाऊल घेण्याचं कारण प्रदीप काळे हा आहे, असं लिहले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.