प्रेमात नको ते धाडस करणं जीवावर बेतलं, रात्री प्रेयसीला भेटायला गेला अन्…

प्रेमात पडल्यानंतर व्यक्तीला जोडीदारासाठी काय करु काय नको असं होतं. मग आपल्या जोडीदारासाठी कोणताही धोका पत्करायची तयारी असते. पण कधी कधी खरंच नको तो प्रयत्न जीवावर बेततो.

प्रेमात नको ते धाडस करणं जीवावर बेतलं, रात्री प्रेयसीला भेटायला गेला अन्...
प्रेयसीला भेटायला गेला अन् जीव गमावला
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 7:13 PM

हनुमानगढ : व्यक्ती प्रेमात पडला की तो आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असतो. अगदी कोणताही धोका पत्करायला तयार असतो. पण कधी कधी हे धाडस खरंच जीवावर बेततं. अशीच एक घटना राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत एक तरुण प्रेयसीला भेटायला गेला. पण त्याचं हे धाडस जीवाववर बेतलं. प्रेयसीच्या आईने त्याला पाहिले आणि अन्य एकाच्या मदतीने त्याची हत्याच केली. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

प्रेयसीला भेटायला गेला पण आईने पाहिलं अन्…

मयत तरुण मुकेशचे आरोपी महिला मायाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे तो सोमवारी रात्री प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप मायाच्या घरी गेला होता. मात्र मायाला त्याची चाहूल लागली. मायाने दुसरा आरोपी सुखरामसोबत मिळून मुकेशची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले. यानंतर माया आणि सुखरामला ताब्यात घेतले आहे. पोलीस दोघांची कसून चौकशी करत आहेत.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई

मुकेशचा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच हत्येमागे केवल हेच कारण होतं की अन्य काही याबाबतही पोलीस तपास करत आहेत. तपासाअंतीच सर्व प्रकार उघडकीस येईल.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.