ड्रेस फिट बसत नव्हता म्हणून तरुणी चिडली, मग दुकानदारासोबत जे केले ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल !
तरुणीने 26 जानेवारी मन्नत सिलेक्शन या दुकानातून एक ड्रेस घेतला होता. हा ड्रेस तिला फिटिंग बसत नव्हता म्हणून ती पुन्हा दुकानात आली आणि दुकानातील कामगाराशी वाद घालू लागली.
जोधपूर : ड्रेस फिट बसला नाही म्हणून एका तरुणीने चक्क दुकानदाराला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना राजस्थानमधील जोधपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सरदारपुरा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीने दुकान मालक शाहरुख आणि सलमान विरोधात छेडछाड आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुकानदार शाहरुखने तरुणी आणि घरच्यांविरोधात दुकानात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीने दोन दिवसापूर्वी ड्रेस घेतला होता
तरुणीने 26 जानेवारी मन्नत सिलेक्शन या दुकानातून एक ड्रेस घेतला होता. हा ड्रेस तिला फिटिंग बसत नव्हता म्हणून ती पुन्हा दुकानात आली आणि दुकानातील कामगाराशी वाद घालू लागली.
ड्रेस फिटिंग नसल्याची तक्रार केल्याने वाद
तरुणीने दुकादाराकडे ड्रेस खराब असल्याची तक्रार केली. यावरुन तरुणी आणि दुकानदारामध्ये वाद झाला. यानंतर तरुणीने पोन करुन आपल्या घरच्यांना बोलावले. यानंतर दोन्ही गट आपसात भिडले.
मारहाणीत चार जण जखमी
दोन्ही गटात झालेल्या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत. तरुणीने घरच्यांसह दुकानात घुसून दुकानदाराला मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
परस्परविरोधी गुन्हे दाखल
तरुणीसोबत आलेल्या लोकांनी गल्ल्यातील 50 हजार रुपये लुटल्याचे दुकानदाराने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.