उपचारादरम्यान तरुणीचा गर्भपात झाला, मग डॉक्टर दाम्पत्याने जे केले ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल !

तरुणीच्या नातेवाईकांना हे नर्सिंग होम बेकायदेशीर असल्याची माहिती नव्हती. डॉक्टरांनी तरुणीवर उपचार सुरु केले, मात्र तिचा गर्भपात झाला आणि तिची तब्येत बिघडू लागली. यामुळे डॉक्टर दाम्पत्य घाबरले.

उपचारादरम्यान तरुणीचा गर्भपात झाला, मग डॉक्टर दाम्पत्याने जे केले ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल !
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 3:25 PM

हाजीपूर : बिहारमधील हाजीपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बोगस डॉक्टर दाम्पत्याकडे उपचारासाठी आलेल्या तरुणीचा गर्भपात झाला. यादरम्यान तरुणीची तब्येत बिघडल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी भृण कुत्र्यांना खायला घातला. यावेळी तरुणीचाही मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता ही खळबळजनक बाब उघडकीस आली. पोलीस तपासात सदर नर्सिंग होम देखील बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे. तसेच या डॉक्टर दाम्पत्याकडे एमबीबीएसची डिग्री नसल्याचेही उघडकीस आले आहे. घटनेनंतर आरोपी डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहेत. पोलीस फरार दाम्पत्याचा शोध घेत आहेत.

वैशाली जिल्ह्यातील बलिगाव पोलीस ठाण्याअंतर्गत चंपापूर अग्रैल गावात घडली आहे. मयत तरुणी तीन महिन्यांची गरोदर होती. तिच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईक तिला घेऊन सदर नर्सिंग होममध्ये घेऊन गेले.

तरुणीच्या नातेवाईकांना हे नर्सिंग होम बेकायदेशीर असल्याची माहिती नव्हती. डॉक्टरांनी तरुणीवर उपचार सुरु केले, मात्र तिचा गर्भपात झाला आणि तिची तब्येत बिघडू लागली. यामुळे डॉक्टर दाम्पत्य घाबरले.

हे सुद्धा वाचा

पोलीस केस होईल या भीतीने या डॉक्टर दाम्पत्याने गर्भपातानंतर भृण आपल्या पाळीव कुत्र्याला खायला घातले. तरुणीची तब्येत अधिक बिघडल्याने नातेवाईक तिला महुआ रुग्णालयात घेऊन गेले. तेथून तिला पटना येथे रेफर करण्यात आले.

पटना येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी सदर डॉक्टर दाम्पत्याच्या निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच फरार डॉक्टर दाम्पत्याचाही शोध घेत आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.