कारला हात देणं पडलं महागात, चालकाने चालू गाडीतच काय केलं ?

ठाण्यात एका महिलेला रिक्षा चालकाने फरफटत नेल्याची घटना ताजी असताना नाशिकच्या आडगाव परिसरात कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

कारला हात देणं पडलं महागात, चालकाने चालू गाडीतच काय केलं ?
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 1:07 PM

नाशिक : नाशिकमध्ये लिफ्ट मागणाऱ्या 21 वर्षीय मुलीला कारमध्ये बसवत तिचा विनयभंग करून बलात्काराची (Rape) धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव पोलीस (Nashik Police) ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक-औरंगाबाद रोडवरील मांडसांगवी परिसरात हि घटना घडली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. माडसांगवी परिसरात राहणाऱ्या कारचालक प्रवीण पेखळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नांदूर नाका ते मांडसांगवी टोल नाका दरम्यान ही खळबळजनक घटना घडली आहे. टोल नाक्यावर गाडी हळू झाल्याने मुलीने आरडाओरड केल्यानं तिच्या मदतीला टोल नाक्यावर कर्मचारी धावून आले. त्यामुळे नराधमाच्या हातून पीडितेची सुटका झाली आहे. एकूणच या घटनेनंतर महिलांच्या दृष्टीने रात्रीचा प्रवास सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ठाण्यात एका महिलेला रिक्षा चालकाने फरफटत नेल्याची घटना ताजी असताना नाशिकच्या आडगाव परिसरात कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

नाशिकच्या नांदूर नाका परिसरात रात्री 11 वाजेच्या सुमारास एक 21 वर्षीय तरुणी लासलगावला जाण्यासाठी उभी होती.

हे सुद्धा वाचा

मात्र मांडसांगवी येथील प्रवीण पेखळे याने तरुणीने हात दिल्याने गाडी थांबवली, लासलगावला जाताय का असे विचारले असता आरोपीने हो सांगत तिला गाडीत बसविले.

आरोपीने पीडित तरुणीकडे विचित्र हावभाव करण्यास सुरुवात केली, त्याच वेळी पीडित तरुणीने मला मांडसांगवी टोल नाक्यावरचा उतरून द्या असे सांगितले.

आरोपीने मात्र त्याचवेळी पीडित तरुणीचा हात धरला, तिच्यावर जबरदस्ती करत बलात्काराची धमकीही त्याने दिली.

मांडसांगवी टोल नाका जवळ येताच पीडित तरुणीने आरडाओरड सुरु केली, टोल नाक्यावरील कर्मचारी पीडितेच्या मदतीला धावून आले.त्यामुळे पीडितेची सुटका झाली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.