मित्रासोबत चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आली होती, मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसले अन् पुढे…

मित्र-मैत्रिणी दोघे हॉटेलच्या रुममध्ये थांबले होते. अचानक दोघांमध्ये काहीतरी बिनसले, मग पुढे जे घडले ते भयंकर होते. यानंतर प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले.

मित्रासोबत चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आली होती, मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसले अन् पुढे...
मित्राकडून तरुणीवर अत्याचार
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 3:40 PM

मुंबई : अनेक जण मायानगरी मुंबईत आपले नशीब आजमावण्यासाठी येत असतात. काही यशस्वी होतात, तर अपयशी होऊन परततात. असेच आपले नशीब आजमावण्यासाठी हरियाणातील एक तरुणी एका चित्रपटाच्या शूटींगसाठी आपल्या मित्रासोबत मुंबईत आली होती. तरुणी आणि तिचा मित्र एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये उतरले होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला अन् पुढे जे घडले ते कल्पनेपलिकडचे होते. मित्राने तरुणीवर बलात्कार करुन तिच्यासोबत आणखी अमानुष कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात बलात्कार, मारहाण आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वादातून पीडितेसोबत अमानुष कृत्य करत अत्याचार

विकास रावत असे 38 वर्षीय आरोपीचे नाव आहे. विकास आणि पीडित तरुणी मूळचे हरियाणातील रहिवासी असून, चित्रपटाच्या शूटिंगसाठी रविवारी रात्री मुंबईत आले होते. दोघेही दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. दोघांमध्ये काहीतरी वाद झाला यानंतर विकासने तरुणीला मारहाण करण्यास सुरवात केली. तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले आणि गुप्तांगात चाकूचे हँडल घुसवून लैंगिक अत्याचार केले.

आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

पीडित तरुणीने मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.