Satara Sickle : साताऱ्यात दहीहंडी कार्यक्रमात युवकाने नाचवला कोयता, दोन संशयित तरुणांना चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात
साताऱ्यातील तालीम संघ मैदान या ठिकाणी छत्रपती उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने भव्य दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातून उदयनराजे भोसले यांचे समर्थक या कार्यक्रम ठिकाणी आले होते.
सातारा : दहीहंडी कार्यक्रमात एका अनोळखी युवकाने कोयता (Sickle) नाचवल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोन संशयित युवकां (Suspected Youth)ना चौकशीसाठी ताब्यात (Detained) घेतले आहे. साताऱ्यातील तालीम संघ मैदान या ठिकाणी छत्रपती उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने भव्य दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातून उदयनराजे भोसले यांचे समर्थक या कार्यक्रम ठिकाणी आले होते. कार्यक्रमाच्या मैदानावर अनेक ठिकाणी युवक डॉल्बीच्या तालावर बेधुंद नाचत होते. यावेळी एका घोळक्यात एका अनोळखी युवक कोयता नाचवताना पोलिसांच्या निदर्शनास आला. हातात शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी संबंधित अज्ञात युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन
साताऱ्यातील तालीम संघ मैदानावर घेण्यात आलेल्या उदयनराजे मित्र समूहाच्या दहीहंडी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या हटके स्टाईलने सर्वांना इशारे करत हजारो युवकांची मने जिंकली. यावेळी त्यांना स्टेजवर दहीहंडी फोडण्याची कार्यकर्त्यांनी विनंती केली यावर त्यांनी स्टेजवर समोर असणारी दहीहंडी फोडून चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. यावेळी त्यांनी दुतर्फा सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीच्या समोरून रॅम्पवर वॉक करत युवकांना हात वारे करत युवकांचे मने जिंकली.
कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून आले होते उदयनराजे समर्थक
या कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पूजन केले. दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातून उदयनराजे समर्थक दाखल झाले होते. यावेळी कार्यक्रमाच्या दरम्यान डॉल्बी लावण्यात आला होता. डॉल्बीच्या तालावर तरुण नाच होते. यादरम्यान अचानक एक अनोळखी युवक कोयता नाचवत होता. पोलिसांची नजरेत ही बाब येताच त्यांनी तात्काळ त्या युवकासह अन्य एकाला ताब्यात घेतले. (A youth danced with sickle in Dahi Handi program in Satara, Two young suspects have been detained by the police)