Hit & Run : कारने स्कूटीला धडक दिली, मग तरुणाला 350 मीटर फरफटत नेले !

दिल्लीच्या केशवपुरम परिसरात हा विचित्र अपघात घडला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचे बोनेट उघडले आणि अपघातग्रस्त स्कुटी बंपरमध्ये अडकली होती. गुरुवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास हा अपघात घडला.

Hit & Run : कारने स्कूटीला धडक दिली, मग तरुणाला 350 मीटर फरफटत नेले !
कारची स्कूटीला धडकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 11:50 PM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये हिट अँड रनचे प्रकरण उघडकीस आले आहे. भरधाव वेगातील एका कारने समोरून चाललेला स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील दोन तरुण हवेत फेकले गेले. यातील एक तरुण कारच्या छतावर पडला तर दुसरा तरुण विंड स्क्रीन आणि बोनट यात अडकला होता. धक्कादायक बाब म्हणजे या अडकलेल्या तरुणाला तब्बल साडेतीनशे मीटरपर्यंत कारने फरफटत नेले. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात घडल्यानंतर कारवाईच्या भीतीने कार चालकाने पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कसून तपास सुरू केला आहे.

कारचे बोनेट उघडले अन् स्कुटी बंपरमध्ये अडकली

दिल्लीच्या केशवपुरम परिसरात हा विचित्र अपघात घडला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचे बोनेट उघडले आणि अपघातग्रस्त स्कुटी बंपरमध्ये अडकली होती. गुरुवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास हा अपघात घडला. केशवपुरम परिसरात दोन पीसीआर पेट्रोलिंग करीत होते. याचदरम्यान भरधाव कारने प्रेरणा चौकामध्ये एक्टिव्हा स्कुटीला जोरदार धडक दिली.

कारमधील पाच जण पोलिसांच्या ताब्यात

स्कुटीला धडक दिल्यानंतर कार थांबवण्याऐवजी कार चालकाने पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्कुटी चालक तरुणाला साडेतीनशे मीटरपर्यंत फरफटत नेण्यात आले. पोलिसांच्या पीसीआरने कार चालकाचा पाठलाग केला आणि कारच्या चालकासह आतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण लग्नाच्या समारंभातून परतत होते आणि दारूच्या नशेत होते, असे वैद्यकीय तपासणीनंतर उघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

अपघातात गंभीर जखमी झालेल्या कैलाश भटनागर आणि सुमित खारी या दोघांना पोलिसांनी रुग्णालयात हलवले. यातील कैलाशचा मृत्यू झाला असून, सुमितवर अधिक उपचार सुरू आहे. दोन्ही तरुण जीन्सचा फॅक्टरीमध्ये कामाला होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.