Love Crime: पोलिस अधिकारी होण्याच्या आधीच मोठा गुन्हा करुन बसला; लग्न होऊ शकले नाही म्हणून त्याने प्रेमाचा भयानक THE END केला
बेळगाव शहरातील बसव कॉलनीत ही थरारक घटना घडली आहे. संशयित प्रियकराचे नाव रामचंद्र बसाप्पा तेणगी असे आहे. तो 26 वर्षांचा होता. तो मुळचा सौंदत्ती येथे राहत होता. येदूर यरगट्टी येथे राहणाऱ्या एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरुणीच्या कुटूंबियांचा यांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे तरुणीणे लग्न करण्यास नकार दिला. यामुळे रागाच्या भरात हा तरुण नको ते करुन बसला आहे.
बेळगाव: लग्न होऊ शकले नाही म्हणून एका तरुणाने प्रेमाचा भयानक अंत केला आहे. बेळगावात( Belgaum) ही धक्कादायक घटना घडली आहे. यात प्रियकर आणि प्रेयसी दोघांचाही मृत्यू झाला आहे. मृत तरुण आणि तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, तरुणीच्या कुटूंबियांचा लग्नाला विरोध होता. अनेक प्रयत्न करुनही तरुणीच्या घरच्या या लग्नाला तयार नव्हते. यामुळेच प्रियकर तरुणाने अत्यंत भयानक पाऊल उचलले. त्याने प्रेयसीची हत्या करुन स्वत: देखील आत्महत्या(suicide ) केली. विशेष म्हणजे मृत तरुण हा पोलिस अधिकारी होण्याची तयारी करत होता. या घटनेमुळे बेळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बेळगाव शहरातील बसव कॉलनीत ही थरारक घटना घडली आहे. संशयित प्रियकराचे नाव रामचंद्र बसाप्पा तेणगी असे आहे. तो 26 वर्षांचा होता. तो मुळचा सौंदत्ती येथे राहत होता. येदूर यरगट्टी येथे राहणाऱ्या एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरुणीच्या कुटूंबियांचा यांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे तरुणीणे लग्न करण्यास नकार दिला. यामुळे रागाच्या भरात हा तरुण नको ते करुन बसला आहे.
शुक्रवारी सकाळी रामचंद्रने प्रेयसीला भेटायला बोलावले. यावेळी त्याने तिच्याकडे पुन्हा एका लग्नाची विचारणा केली. मात्र, घरचे तयार नसल्याचे सांगत तरुणीने पुन्हा एकदा लग्न करण्यास नकार दिला. यामुळे रागाच्या भरात रामचंद्र याने तिचा गळा आवळून तीची हत्या केली. यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. एपीएमसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रामचंद्रने बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेत पीएसआय परीक्षेची तयारी करत होता. बजडा पोलिस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. तर त्याची प्रेयसी बेळगावमध्ये नर्सिंगचा कोर्स करत होती. दोघांचेही एकमेकांवर त्यांचे प्रेम होते मात्र घरच्या लोकांचा प्रेमाला विरोध झाल्यामुळे रामचंद्रने दोघांचेही जीवन संपवले.