मित्रासोबत प्रँक केला, मग थेट तुरुंगात पोहचला, काय आहे प्रकरण?
एका तरुणाला मित्रासोबत प्रँक करावा वाटला. पण हा नसता त्याला इतका महागात पडला की थेट तुरुंगातच जावं लागलं.
मुंबई : मित्रासोबत नको तो प्रँक करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला गोव्यातून अटक केली आहे. रमेशकुमार यादव असे आरोपीचे नाव आहे. रमेशकुमारने अज्ञात व्हॉट्सअॅप नंबरवरून मित्र सागर मोलावडे याला प्रँकच्या करण्याच्या उद्देशाने दोन दहशतवादी संदेश पाठवले. सागरने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सदर मँसेजचा आणि नंबरचा शोध घेतला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व प्रकार प्रँक असल्याचे उघड झाले.
तक्रारदाराला अज्ञात नंबरवरुन दोन मॅसेज आले
सागर मोलावडे हे अंधेरीच्या एमआयडीसी भागातील जीपी पेट्रोलियममध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. सागर मोलावडे हे गुरुवारी सायंकाळी कामावरुन घरी परतत होते. यावेळी त्यांना 7.02 वाजता एक मॅसेज आला. “नऊ वाजताच्या ट्रेनचा प्लॅन आहे… भरलेली असेल. आम्ही आमच्या ध्येयात यशस्वी होऊ. खुदा हाफिज”, असे मॅसेजमध्ये लिहिले होते. नंतर 8.27 वाजता दुसरा मॅसेज आला. त्यात “गाड्यांमध्ये गर्दी असेल आणि त्याच वेळी आम्ही आमचे मिशन सुरू करू. येथे सर्व काही ठीक आहे, आपण ट्रेनमध्ये भेटू. आमचे सर्व फोन 10 नंतर बंद होतील”, असे लिहिले होते.
तपासात प्रँकसाठी आरोपीने हे केल्याचे उघड
मोलावडे यांनी दोन्ही मॅसेजचे स्क्रीनशॉट घेऊन पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी कलम 505 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने पोलिसांनी तातडीने अनेक पथके तयार केली. पोलिसांनी ज्या नंबरवरुन तक्रारदाराला मॅसेज आला तो नंबर ट्रेस करुन त्याचा मागोवा घेतला. नंबर ट्रेस करत आरोपीला गोव्यातून अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने सर्व केवळ मित्रासोबत प्रँक करण्यासाठी केले असल्याचे सांगितले.