भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणालाच संपवले; गावगुंडांची दहशत सीसीटीव्हीमध्ये कैद

विरारमध्ये दोन जणांमध्ये वाद सुरू होता. यावेळी बैजनाथ हा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडला. याचा राग आल्याने गुंडांनी बैजनाथलाच बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणालाच संपवले; गावगुंडांची दहशत सीसीटीव्हीमध्ये कैद
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 11:30 PM

विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार : दोघांमध्ये सुरु असलेला वाद सोडवायला गेलेल्या तरुणाची गावगुंडांनी हत्या (Youth Murder) केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. तरुणाला बेदम मारहाण करत गुंडांनी संपवले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident Caught in CCTV) झाली आहे. बैजनाथ शर्मा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो विरार पूर्व सहकार नगर येथील रहिवासी आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी (Virar Police) चौघांना अटक केली आहे.

वाद सोडवण्यासाठी मध्ये पडला

विरारमध्ये दोन जणांमध्ये वाद सुरू होता. यावेळी बैजनाथ हा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडला. याचा राग आल्याने गुंडांनी बैजनाथलाच बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

देवीचे विसर्जन केल्यानंतर घडली घटना

दसऱ्याच्या दिवशी देवीचे विसर्जन करून घरी जात असताना विरार पूर्व सहकार नगरमध्ये मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मारहाण आणि लाठी, काठी घेऊन पळापळ करताना सर्व आरोपी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

विरार पोलिसांकडून आरोपींना अटक

निलेश नरेश माळी, नितेश उर्फ गुड्डू नरेश माळी, अक्षय गिरी यांच्यासह अन्य 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात 9 जणांवर भादवी कलम 302, 326, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.