एक मुलगी, दोन आशिक, एक थप्पड आणि सर्व काही खल्लास !, काय आहे प्रकरण?

एकाच तरुणीवर दोघांचा जीव जडला होता. ती एकाशीच प्रामाणिक नाते निभावत होती. काही कारणाने तरुणीच्या प्रियकराने तिच्यासमोरच तरुणीच्या दुसऱ्या चाहत्याला कानशीलात लगावली आणि शेवटचीच ठरली.

एक मुलगी, दोन आशिक, एक थप्पड आणि सर्व काही खल्लास !, काय आहे प्रकरण?
प्रेमप्रकरणातून मित्रानेच मित्राला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 7:41 PM

आंबेडकर नगर : आपल्या आवडत्या मुलीसमोर कानशीलात लगावल्याने संतापलेल्या अल्पवयीन मुलाने जे केले ते अतिशय भयंकर होते. अल्पवयीन मुलाने मित्रांच्या मदतीने कानशीलात मारणाऱ्या तरुणाला थेट संपवले. राहुल कटारा असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुलचे आणि अल्पवयीन मुलाचे एकाच मुलीवर प्रेम होते. मात्र मुलीचे राहुलसोबत प्रेमसंबंध सुरु होते. एके दिवशी काही कारणातून राहुलने तरुणीसमोरच अल्पवयीन मुलाच्या कानफटात मारली. आपल्या आवडत्या मुलीसमोर मारल्याने अल्पवयीन मुलाला फार अपमानास्पद वाटले. यातून त्याने तरुणाचा काटा काढला.

तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

आंबेडकर जिल्ह्यात तरुणाचा मृतदेह आढळळ्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटवणे कठिण जाले होते. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करत तरुणाची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच टेक्नीकल सर्विलान्सची पण मदत घेतली.

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोकल इंटेलिजेंसच्या मदतीने अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यादरम्यान पोलिसांना आरोपी आग्रा येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस आग्रा येथे आरोपीला पकडण्याच्या तयारीत असतानाच आरोपींनी तेथून पलायन केले आणि दिल्ली गाठली. दिल्लीतून हरिद्वारला पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

हे सुद्धा वाचा

आरोपीपैकी तिघे अल्पवयीन

आरोपींनी राहुलचे अपहरण केले, मग त्याची हत्या करुन मृतदेह तेथेच टाकून पळाले. मात्र अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी तीन अल्पवयीन मुलं आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.