मोठ्या भावाच्या नावाची हळद लावली अन् छोट्या भावासोबत सात वचनं घेतली, नेमके काय घडले?

गुन्नौरमध्ये नगरपंचायतमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या ठेकेदारीचं काम करु लागला. तर त्याची पत्नी दिल्लीतच होती. याचदरम्यान त्याच्या घरच्यांनी त्याचा अलिगढ येथील मुलीशी विवाह ठरवला. विवाहापूर्वीच्या सर्व विधी सुरु झाल्या. हळदीचा कार्यक्रमही झाला.

मोठ्या भावाच्या नावाची हळद लावली अन् छोट्या भावासोबत सात वचनं घेतली, नेमके काय घडले?
रिसेप्शनपूर्वीच नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 2:01 PM

संभल : उत्तर प्रदेशात एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. एका विवाहसमारंभादरम्यान नवरदेवाची पहिली पत्नी ऐन लग्नात पोलीस घेऊन हजर झाली. मग जे घडले ते पाहून सर्वच हैराण झाले. ऐन लग्नात पोलीस हजर झाल्याने मोठा राडा झाला. बराच वेळ वादावादी झाल्यानंतर अखेर नवरदेवाच्या छोट्या भावासोबत नवरीचा विवाह करण्यात आला. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील गुन्नौर येथे ही घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा रंगली आहे. पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले. यानंतर तरुणाने पत्नीला सांभाळण्याची हमी दिल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले.

पहिले लग्न झालेले कुटुंबापासून लपवले

संभल जिल्ह्यातील गुन्नैरमध्ये राहणारा डॅनी हा तरुण कामानिमित्त गेला होता. तेथे त्याने एका तरुणीशी प्रेमविवाह केला. मात्र याबाबत त्याने आपल्या घरच्यांना काहीच माहिती दिली नव्हती. काही दिवसांपूर्वी तो गुन्नैर येथे आपल्या घरी परतला.

गुन्नौरमध्ये नगरपंचायतमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या ठेकेदारीचं काम करु लागला. तर त्याची पत्नी दिल्लीतच होती. याचदरम्यान त्याच्या घरच्यांनी त्याचा अलिगढ येथील मुलीशी विवाह ठरवला. विवाहाच्या विधी सुरु झाल्या. हळदीचा कार्यक्रमही झाला.

विवाहाची माहिती मिळताच पहिली पत्नी हजर झाली

यादरम्यान डॅनीच्या पहिल्या पत्नीला त्याच्या दुसऱ्या विवाहाची माहिती मिळाली आणि ऐन लग्नात ती पोलीस घेऊन हजर झाली. तिने विवाहाचे पुरावेही सादर केले. यानंतर पोलीस लग्नमंडपात थेट पोलीस ठाण्यात नवरदेवाची रवानगी केली.

पोलीस ठाण्यात नेल्यानंतर डॅनीने पहिल्या पत्नीचा सांभाळ करण्याची हमी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली असून, तो पत्नीसोबत दिल्लीला गेला.

अखेर नवरदेवाच्या लहान भावासोबत वधूचा विवाह केला

ऐन लग्नात घडलेल्या प्रकारानंतर लग्नमंडपात मात्र वधूच्या नातेवाईकांनी जोरदार राडा केला. दोन्ही बाजूने जोरदार वादावादी झाली. यानंतर दोन्ही बाजूने समझोता करत अखेर नवरदेवाच्या छोट्या भावासोबत वधूचा विवाह करण्यात आला.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.