युवकाचे विवाहित महिलेशी संबंध; तिच्यावर पैसे उधळून झाला कर्जबाजारी, मग त्याने उचलले हे धोकादायक पाऊलं…

काही दिवसांपूर्वी किरण लादे आणि त्याच्या प्रेयसीचे खटके उडाले. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन ते विभक्त झाले. याचाच राग प्रेयसीवर होता. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील ती आपल्याला सोडून गेली.

युवकाचे विवाहित महिलेशी संबंध; तिच्यावर पैसे उधळून झाला कर्जबाजारी, मग त्याने उचलले हे धोकादायक पाऊलं...
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 3:22 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर केलेल्या खर्चाची वसुली करण्यासाठी वेगळा फंडा वापरला. त्याने चक्क प्रेयसीच्या मुलाचे फिल्मी स्टाईल अपहरण केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. सदर प्रकरणाचा तपास नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावला. मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांच्या सोलापूर (Solapur) आणि सांगली जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत.

प्रेयसीवरील खर्चाने झाला कर्जबाजारी

किरण लादे या तरुणाचे अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या आईसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संबंधातून ते एकत्र राहत होते. किरण लादे हा त्याच्या प्रेयसीवर म्हणजेच अपहरण झालेल्या मुलाच्या आईवर मोठ्या प्रमाणात खर्च करत होता. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता.

हे सुद्धा वाचा

भांडण झाल्याने विभक्त राहिले

काही दिवसांपूर्वी किरण लादे आणि त्याच्या प्रेयसीचे खटके उडाले. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन ते विभक्त झाले. याचाच राग प्रेयसीवर होता. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील ती आपल्याला सोडून गेली.

नळदुर्ग पोलिसांत तक्रार

याचा राग मनात धरून आरोपीने चक्क आपल्या साथीदाराच्या मदतीने तिच्या मुलाचे अपहरण केले. दोन लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. मुलगा गायब झाल्याने नळदुर्ग पोलिसांच्या हद्दीतील काटगाव या गावातील मुलाच्या आईने आणि तिच्या नातेवाईकांनी नळदुर्ग पोलिसांमध्ये तक्रार दिली.

दोन पथकांनी तपास केला

नळदुर्ग पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आपले सूत्र हलवली. दोन पथकं तयार करत सांगली मोबाईलच्या लोकेशनवरून सांगली आणि सोलापूरमध्ये तपास केला. आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि अपहरण केलेल्या मुलाला ताब्यात घेऊन तिच्या आईच्या स्वाधीन केले.

प्रेमातून वितुष्ट

या प्रकरणात नेमकं काय झालं याची माहिती तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे यांनी दिली. प्रेमातून वितुष्ट निर्माण होतात. त्याचा शेवट कसा सूड उगविण्यात होऊ शकतो, हे या घटनेतून दिसून येते. संबंध केव्हा खराब होतील काही सांगता येत नाही. त्यातून अशा घडना घडतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.