Abhishek Ghosalkar Murder : …तर अभिषेक घोसाळकर वाचले असते, दहिसर गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर!
Abhishek Ghosalkar Murder : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येची सर्वत्र चर्चा होत आहे. आरोपी मॉरिस भाई याने फेसबुक लाईव्ह करत त्यांच्याव गोळीबार केला. त्यानंतर स्वत:लाही गोळी घालून संपवलं. या घटनेने दहिसरमध्ये खळबळ उडाली आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेसवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने दहिसर परिसरात खळबळ उडाली. घोसाळकर यांच्याच भागात राहणाऱ्या मॉरिस भाई याने शांत डोक्याने कट रचत घोसाळकर यांना गोळ्या घालून संपवलं. मॉरिस भाई जेलमध्ये गेला होता, तेव्हा यामागे घोसाळकर यांचा हात असल्याचा त्याचा समज होता. जेलमधून बाहेर आल्यावर त्याने शांतपणे कट रचला. घोसाळकर यांना संपवल्यावर मॉरिस भाई याने स्वत:च्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेत मॉरिसने फेसबुक लाईव्ह करत घोसाळकर यांना गोळ्या घातल्या. अशातच मोठी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे घोसळकर बचावले असते, नेमके कशामुळे जाणून घ्या.
…तर अभिषेक घोसाळकर बचावले असते!
अभिषेक घोसाळकर यांना मारण्याचा कट मॉरिस याच्या डोक्यात खूप दिवसांपासू सुरू होता. मॉरिस याच्याकडे गन कुठून आली हा सवाल प्रत्येकाला पडला. मॉरिस हा हुशार होता त्याने दोन महिन्यांआधी अमरेंद्र मिश्रा याला अंगरक्षक म्हणून ठेवलं होतं. मिश्रा याला कामावर घेण्यासाठी मॉरिसने एक अट ठेवली होती. मिश्रा यांच्याकडे अललेल्या गन ड्रॉव्हरमध्ये असेल आणि या ड्रॉव्हरची चावी मिश्राकडेच असणार, मात्र मॉरिसकडे दुसरीसुद्धा चावी असणार, कारण याच गनने त्याने घोसळकर यांच्यावर हल्ला केला.
अभिषेक घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस 14 फेब्रुवारीला होता, यासाठी घोसाळकर यांनी मनालीची तिकिटेसुद्धा काढली होतीत. अभिषेक आणि त्यांची पत्नी मुलं मनालीला जाणार होते. आज सकाळी 6 वाजता मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळावरून फ्लाईट होती. जर ही फ्लाईट काल म्हणजचे घोसाळकर यांची हत्या झाली त्या दिवशीच असते तर घोसाळकर मनालीसाठी रवाना झाले असते.
जर मॉरिसला या तिकिटांबद्दल माहिती असेल तर त्याने ठरवूनसुद्धा घोसाळकर यांना साडी वाटप कार्यक्रमासाठी बोलावलेलं असू शकतं. जर काही माहिती नसती आणि घोसाळकरांची फ्लाईट काल म्हणजेच गुरूवारी असती तर निश्चितच ते आज आपल्यात असते.