कॉलेजचा मित्र म्हणून रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली, बोलण्यातून त्याने तिला जिंकलं पण नंतर जे घडलं ते धक्कादायक आहे…
नाशिकमधील एका विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित तरुणींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : सोशल मीडियावर ( Social Media ) अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका. कुणी फोटो, व्हिडिओ ( Photo Video ) मागितल्यास ते देऊ नका असं आवाहन सायबर पोलीस वारंवार करत आहे. त्याचे कारण म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यामातून आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग करणे, बदनामी करणे याशिवाय शारीरिक अत्याचार करण्यापर्यन्तच्या घटना समोर आल्या आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या शहरात अशा घटना घडत असतांनाही काहीजण बळी पडत आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ( Nashik Police ) ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानं खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन देवळाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पडीत मुलीने स्नॅपचॅट या चॅटअॅपवर अकाऊंट उघडले होते.
त्यावर पीडित मूलगी ही आपल्या मैत्रिणीशी बोलत असायची, हळूहळू तिला शाळेतील मित्रानेच रिक्वेस्ट पाठवली तीने ती अॅक्सेप्ट केली, त्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणं होऊ लागलं.
पीडित मुलगी आणि संशयित मुलगा यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यानंतर दररोज होणाऱ्या बोलण्यात त्याच्यात प्रेमाच्या गोष्टी होऊ लागल्या. नंतर मित्राच्या मागणीवरुन पीडित मुलगी हवं तसं करू लागली. ती इथेच फसली.
पीडित मुलीने अश्लील व्हिडिओ आणि फोटो मुलाला पाठविले. त्यामध्ये त्यांच्यात बरंच काही बोलणं होत होते. मात्र, नंतर त्यांच्यात वाद सुरू झाले, वाद हळूहळू वाढतच गेला. त्यामध्ये पीडित तरुणीला तीचा मित्र धमकावू लागला.
वाद इतका टोकाला गेला की पीडित तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केले. त्यात मुलीची बदनामी होऊ लागल्याने मुलीने त्याला व्हिडिओ फोटो डिलिट करण्याची विनंतीही केली होती.
पीडित मुलीने ही संपूर्ण बाब तिच्या आईला सांगितली. त्यावरून देवळाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बाललैंगिक अत्याचार, सोशल मिडियावर बदनामी असा गुन्ह्यात समावेश आहे.
पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर संशयित मुलाचा शोध देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस घेत असून याबाबत सायबर पोलीसांनीही तपास सुरू केला आहे. यामध्ये मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही.
पीडित मुलीला सोशल मीडियावरील मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांकडून वेळोवेळी केली जनजागृती विचारात घेऊन सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा पश्चाताप करण्यापलीकडे हाती काहीही लागत नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा.