VIDEO | गुजरातमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस टोल प्लाझामध्ये घुसली; अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी सोनगढ येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. बसचा चालक, कंडक्टर आणि ड्रायव्हर केबिनजवळ बसलेले दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चौघांना तापी जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे.
नंदुरबार : लग्नाचे वऱ्हाड घेऊन गुरातला जाणाऱ्या एका खाजगी बसला सोनगढ येथील मंडल रोडवर भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस थेट टोलनाक्यावर घुसली. जखमींना उपचारासाठी सोनगढ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सोनगढ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाडींनी भरलेली ही बस बुरहानपूर (महाराष्ट्र) येथून सुरतकडे परतत होती. बसमध्ये सुमारे 40 लोक होते.
कशी घडली घटना?
महाराष्ट्रातील बुरहानपूर येथील मुलीचे गुजरातमधील सूरत येथील मुलाशी लग्न ठरले. लग्न महाराष्ट्रात आज मुलीच्या मांडवात पार पडले. सर्व विधी, जेवणं, पाहुणचार असे लग्नाचे ,सर्व सोपस्कार आनंदाने आमि उत्साहाने पार पडले. शेवटी क्षण आला तो पाठवणीचा. माहेरुन आनंदात नवरीची पाठवणी झाली. नवरा नवरी पाठोपाठ वऱ्हाडीही बसने मागोमाग निघाले. बस गुजरातमधील तापी जिल्ह्यात सोनगढ येथील मंडल टोल नाक्यावर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोहचली. बस भरधाव वेगात असल्याने चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन् भरधाव वेगातील बस टोल चेकचा ब्रेकर ओलांडून थेट केबिनमध्ये घुसली. या अपघातात बसमधील 15 प्रवाशांसह टोलनाक्यावरील 3 कर्मचारी असे एकूण 18 जण जखमी झाले.
चौघांची प्रकृती चिंताजनक
अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी सोनगढ येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. बसचा चालक, कंडक्टर आणि ड्रायव्हर केबिनजवळ बसलेले दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चौघांना तापी जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की, केबिनमध्ये बसलेली महिला कॅशियरही जखमी झाली असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याचवेळी केबिनजवळ उभी असलेली एक महिला आणि एक पुरुष कर्मचारीही जखमी झाला. बसच्या धडकेने टोलनाक्याची केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, तेथे ठेवलेल्या मशिन्सचेही नुकसान झाले आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही फुटले. (Accident of private travels bus in Gujarat, 18 people injured, incident catched in cctv camera)
इतर बातम्या
पिंपरीत क्रिकेट मॅचच्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातली बॅट ; दोघांवर गुन्हा दाखल