Nanded accident : अंत्यविधीसाठी निघाले वाटेत मृत्यूने गाठले; भिषण अपघातात दोन ठार, 15 जखमी

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला (Nanded) निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात (Accident) घडल्याची घटना घडली आहे. वाहनाचे टायर फुटून हा अपघात घडला. या अपघातामध्ये सासू आणि जावायाचा जागीचा मृत्यू झाला आहे.

Nanded accident : अंत्यविधीसाठी निघाले वाटेत मृत्यूने गाठले; भिषण अपघातात दोन ठार, 15 जखमी
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 8:43 AM

नांदेड : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला (Nanded) निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात (Accident) घडल्याची घटना घडली आहे. वाहनाचे टायर फुटून हा अपघात घडला. या अपघातामध्ये सासू आणि जावायाचा जागीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य पंधरा जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी नांदेड- हैदराबाद मार्गावरील कृष्णूरजवळ ही घटना घडली आहे. देगलूर नाका परिसरात एका नातेवाईकाचे निधन झाल्याने हे सर्व जण चारचाकीने (Car accident) नांदेडच्या दिशेने निघाले होते. मात्र अत्यविधीला पोहोचण्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. नांदेड- हैदराबाद महामार्गावर कुष्णूरजवळ गाडीचे समोरील टायर फुटल्याने जीप उलटली.  या अपघातात सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. शेख महेबूब बाबू शेख (40) व अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख (55) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

जखमींची नावे

तर या अपघातामध्ये  पिरसाब नवाबसाब शेख (65,गोनेगाव), खाजा मगदूम शेख (45), फरजना खाजा शेख (40, देगाव), खुदबोद्दीन नवाज साब (60 देगाव), घाशी साब बाबूसाब शेख (55, चालक, गोनेगाव ), शादुल बाबूसाब शेख (45, गोनेगाव) , आजमिर महेबूब शेख (40, गोनेगाव), खाजा साब मौलासाब शेख (45), हैदर इस्माईल साब शेख (40, गोनेगाव) हे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य सात जण या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातीमधील सर्व जखमींवर सध्या नादेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

तिघांची प्रकृती चिंताजनक

अपघाताची माहिती समजताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी, पोलीस उप निरिक्षक दिनेश येवले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर काही जखमींनी मदतीची वाट न बघता मिळेल त्या वाहनाने नांदेड गाठले. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिंना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. अत्यंविधीला पोहण्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने तसेच यातील काही जण गंभीर जखमी असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.