Jalgaon Crime : आत्या म्हणत घरात घुसला, मग वृद्ध महिलेकडे पाणी आणायला जाताच डाव साधला !

वृद्ध महिला घरी एकट्या असल्याची संधी साधत त्यांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. चाळीसगावमध्येही अशीच घटना घडली. महिलेने आरडाओरडा करताच चोरटा चप्पल न घालताच पसार झाला.

Jalgaon Crime : आत्या म्हणत घरात घुसला, मग वृद्ध महिलेकडे पाणी आणायला जाताच डाव साधला !
वृद्ध महिलेला लुटून चोरटा पसारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 3:30 PM

खेमचंद कुमावत, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव / 31 ऑगस्ट 2023 : हल्ली घरी एकट्या असणाऱ्या महिलांना हेरुन लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एखक घटना चाळीगावमध्ये उघडकीस आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच आत्या म्हणत चोरटा महिलेच्या घरात घुसला. मग महिलेच्या मुलांशी ओळख असल्याचे भासवत महिलेला बोलण्यात गुंतवले. मग संधी साधून महिलेच्या घरातून रोकड आणि सोने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घरात घुसून घडलेल्या या घटनेमुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील भोरस गावात ही घटना घडली.

महिला घरी एकटीच असल्याची संधी साधत लुटले

रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास महिला घरी एकटी असताना एक अज्ञात व्यक्ती बाईकवरुन घरी आला. त्याने महिलेला आत्या हाक मारत आपली ओळख सांगितली. आपण तुमच्या लहान मुलाच्या सासरवाडीतून आल्याचे सांगत तुमच्या मोठ्या मुलाने मला पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड आणायला पाठवल्याचे सांगितले. यानंतर त्याने महिलेकडे पाणी प्यायला मागितले.

महिलेने आरडाओरडा करताच चोरटा पसार

महिला पाणी आणण्यास गेली असता चोरटाही तिच्या मागे आतल्या रुममध्ये गेला. आतल्या रुममधील पेटीचा टाळा तोडून रक्कम काढू लागला. महिलेने हे पाहताच आरडाओरडा सुरु केला. महिलेचा आरडाओरडा पाहून चोरटा हाताला लागली रक्कम आणि सोने घेऊन पळाला. विशेष म्हणजे चोरटा चप्पलही टाकून गेला. चोरट्याने पेटीतील 1 लाख 7 हजार रुपये आणि 8 ग्रॅम सोने घेऊन तेथून पोबारा केला.

महिलाही चोरट्याच्या मागे बाहेर आरडाओरडा करत आली. शेजारील मुलाने महिलेला पाहिले अन् तिची विचारपूस केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. यानंतर त्या मुलाने महिलेच्या नातवाला घटनेची माहिती दिली. यानंतर घटना उघड होताच गावकऱ्यांनी घराबाहेर एकच गर्दी केली. गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत गावातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....