तुम्हीही या बॅकेत खातं उघडलं असेल तर काही खरं नाही! वेळीच सावध व्हा!

चंद्रबोसकडून पोलिसांनी 56 लाख रुपये हस्तगत केले आहेत. मुख्य आरोपीला अटक झाली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तुम्हीही या बॅकेत खातं उघडलं असेल तर काही खरं नाही! वेळीच सावध व्हा!
आरबीआयच्या अलर्टनंतर बँकेचा पर्दाफाशImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 4:11 PM

चेन्नई : आरबीआयने चेन्नईतील एका बोगस बँकेचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. चंद्रबोस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या बँकेच्या 8 ठिकाणी शाखा असून, या बँकेत आतापर्यंत 2 कोटी रुपयांचे ट्रान्झेक्शन झाले आहे. इकतेच नाही बँकेकडून बेकायदेशीर गोल्ड लोन, एफडी, विकली लोन, पर्सनल लोन आदी कर्ज सुविधा देण्यात येत होती.

आरबीआयच्या अलर्टनंतर बँकेचा पर्दाफाश

आरबीआयने चेन्नईत ‘रुरल अँड अॅग्रीकल्चर फार्मर्स को-ऑपरेटिव्ह बँक’ (RAFC) नामक बोगस बँक सुरु असल्याची माहिती चेन्नई पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा या बँकेचा पर्दाफाश झाला.

बोगस कागपत्रांच्या आधारे सुरु होती बँक

आरोपी चंद्रबोस हा बोगस कागदपत्रांच्या आधारे ही बँक चालवत असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी चंद्रबोसला अटक केली आहे. यावेळी आरएएफसी बँक ही आरबीआयद्वारे सहकारी संस्था म्हणून नोंदणीकृत असल्याचा दावा आरोपीने केला.

हे सुद्धा वाचा

खातेदारांना आयसीआयसीआय बँकेचे कार्ड द्यायचा

चंद्रबोस हा त्याच्या बँकेत खाते खोलणाऱ्या खातेदारांना आयसीआयसीआय बँकेचे कार्ड देत असे. चंद्रबोसकडून पोलिसांनी 56 लाख रुपये हस्तगत केले आहेत. मुख्य आरोपीला अटक झाली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेत आतापर्यंत दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तसेच गोल्ड लोन योजना, एफडी, साप्ताहिक कर्ज, वैयक्तिक कर्ज अशा सुविधाही बँकेकडून पुरविण्यात येत होत्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.