मुंबईत दोन वर्षाच्या मुलीची बापाकडून हत्या, पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक
ज्या मुलीची हत्या तिथं बापाने मानलेली होती असं माहिती आम्हाला मिळाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत अशा अनेक घटना घडल्या आहेत. विविध कारणांनी बापांनी निष्पाप मुलांना संपवल्याचे आपणास पाहावयास मिळाले.
मुंबई – दोन वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना नुकतीच मुंबईत (mumbai) उघडकीस आली आहे. ही घटना भाईंदर पोलिस (bhyandar police) ठाण्याच्या अंतर्गत येत असून पोलिसांनी बापाला सापळा रचून तात्काळ अटक केल्याची माहिती मिळत आहे. आई कामाला गेल्यानंतर घरी असलेल्या बापाने पोरीचा गळा दाबून हत्या केली असल्याचे मुलीच्या आईचे म्हणणे आहे, त्यानुसार पोलिसांनी चौकशी (police inquiry) करून मुलीच्या बापाला अटक केल्याचे समजते. भाईंदर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीची आई कामाला गेलेली असताना मुलगी घरात एकटीचं होती. तसेच तिचा आरोपी बाप सुध्दा घरीचं होता. मुलगी रडायला लागली, तसेच तिचं रडणं थांबत नसल्याने बापाची चिडचिड झाली. त्यामुळे त्याने रागाच्या भरात हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.
या कारणामुळे केली हत्या
ज्या मुलीची हत्या तिथं बापाने मानलेली होती असं माहिती आम्हाला मिळाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत अशा अनेक घटना घडल्या आहेत. विविध कारणांनी बापांनी निष्पाप मुलांना संपवल्याचे आपणास पाहावयास मिळाले. सद्याची घटना, भाईंदर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असून मानलेल्या मुलीची हत्या बापाने केली आहे. मुलीची कामाला गेल्यानंपर बाप आणि मुलगी दोघेही घरी होते. त्यादरम्यान मुलगी अचानक रडायला लागली. तिचं रडण अजिबात थांबत नव्हतं. तसेच रडणं थांबत नसल्याने आरोपीची चिडचिड व्हायला सुरूवात झाली. त्याने शांत बसायला सांगितलं. परंतु ती काही शांत होत नसल्याने चिडलेल्या बापाने मुलीचा गळा दाबला. गळा दाबल्यानंतर गुदमरून तिचा मृत्यू झाला. तिची आई घरी गेल्यानंतर तिच्या हे लक्षात आले. त्यानंतर तिने तात्काळ भाईंदर पोलिस ठाणे गाठले आणि मुलीच्या बापाविरोधात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी करीत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमबी पाटील यांनी सांगितले.
हत्या कधी थांबणार
आत्तापर्यंत मुंबईत अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, की बापाकडून मुलांच्या हत्या झाल्याच्या, परंतु हे नेमकं कशामुळं होतं यावर सुध्दा विचार होणं गरजेचं आहे. कारण अनेक निष्पाप मुलांचे बळी जात असल्याचे अपणास ऐकण्यास किंवा पाहावयास मिळते. आत्तापर्यंत अनेकांनी विविध कारणांनी मुलांचे बळी घेतले आहेत. तसेच ते त्याची शिक्षांही भोगत आहेत. तरीही हत्या घडत असल्याने मोठी चिंता वाटते.