घरात शिरुन तरुणीवर हल्ला, नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय मुलीची हत्या, आरोपी नराधमाने असं का केलं?

प्रेम ही संकल्पना आणि भावना खूप मोठी आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा आपण कधीही न केलेल्या गोष्टी देखील समोरच्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमाखातर करायला तयार होतो. प्रेम ही एक अशी गोष्टी आहे की ज्यामुळे आपण आचार-विचारांनी समृद्ध होतो.

घरात शिरुन तरुणीवर हल्ला, नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय मुलीची हत्या, आरोपी नराधमाने असं का केलं?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 6:11 PM

नांदेड : प्रेम ही संकल्पना आणि भावना खूप मोठी आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा आपण कधीही न केलेल्या गोष्टी देखील समोरच्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमाखातर करायला तयार होतो. प्रेम ही एक अशी गोष्टी आहे की ज्यामुळे आपण आचार-विचारांनी समृद्ध होतो. त्यामुळे या भावनेचा नेहमीच आदर केला पाहिजे. याशिवाय आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीचा आणि त्याच्या विचार-भावनांचा आदर केला पाहिजे. तरंच त्याला प्रेमातलं समर्पण किंवा त्याग म्हणता येऊ शकतं. पण हल्ली बऱ्याचदा प्रेम ओरबाडून घेणाऱ्या घटना समोर येताना दिसतात. ‘माझी झाली नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही’, अशा विकृत विचारातून अनेक अनावश्यक घटना घडताना आपण बघतो. आतादेखील नांदेडमध्ये अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून एका आरोपीने 22 वर्षाच्या तरुणीची गळा चिरुन हत्या केली. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही नांदेड शहरातील शारदानगर भागात घडली आहे. आरोपीचं नाव सुरेश शेंडगे असं आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृतक 22 वर्षीय तरुणी ही घरात एकटी असताना हा सगळा प्रकार घडला. या घटनेमुळे मृतक मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरात कुणी नसताना आरोपीने धारदार शस्त्राने तरुणीची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. थोड्यावेळाने तरुणीचे कुटुंबीय घरी आले तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार समजला. घरातील कुटुंबियांनी तरुणीचा मृतदेह बघून हंबरडा फोडला. त्यानंतर आजूबाजूचे नागरीक घरात आले.

अखेर आरोपीला बेड्या

घटनास्थळी जमलेल्यांपैकी एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर तरुणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी नेमकं काय-काय घडलं? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी सुरेश शेंडगे याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

चोरटा बेकरीत आला, चॉकलेट मागू लागला, संधी मिळताच महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं, शेतातून पळून जात असताना पोलिसांनी घेरलं

‘वहिनीकडे काम करु नको, नाहीतर जीव घेणार’, तलवार दाखवत कामगाराला धमकी, बिथरलेल्या कामगारानेच जीव घेतला

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.