विविध योजनांमध्ये चांगला नफा देण्याचे आमिष, मग नागरिकांचे पैसे घेऊन पसार, पण म्हणतात ना ‘कानून के हाथ लंबे होते है…’

नागरिकांना चांगल्या नफ्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितले. मग गुंतवणूक केलेले पैसे घेऊन फरार झाले. पण कायद्यापुढे कुणीही मोठा नसतो.

विविध योजनांमध्ये चांगला नफा देण्याचे आमिष, मग नागरिकांचे पैसे घेऊन पसार, पण म्हणतात ना 'कानून के हाथ लंबे होते है...'
पतपेढीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करणारे चौघे अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 2:49 PM

डोंबिवली : विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवण्याचे आमिष दाखवत नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मग नागरिकांचे पैसे घेऊन पसार झाल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. श्रमसंपदा निधी लिमिटेड या पतपेढीत 47 ग्राहकांची एकूण 17 लाख 36 हजार 441 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पतपेढीचे संचालक मंडळ आणि शाखा मॅनेजर पतपेढीला टाळं मारुन फरार झाल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली. याप्रकरणी एका ग्राहकाच्या फिर्यादीवरुन पतपेढीचे संचालक आणि शाखा मॅनेजरविरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप हे अधिक तपास करत आहेत.

ग्राहकांची 17 लाखांची फसवणूक

डोंबिवली पूर्वेतील चार रस्त्याजवळ आर पी रोडवर श्रमसंपदा निधी लिमिटेड नावाची पतपेढी होती. या पतपेढीत दैनंदिन ठेवी, आरडी, एफडी स्वरुपात 47 ग्राहकांनी 1 फेब्रुवारी 2020 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान 17 लाख 36 हजार 441 रुपयांची गुंतवणूक केली. पैसे मिळाल्यानंतर संचालक, शाखा मॅनेजर पतपेढीला टाळे मारुन फरार झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले.

पोलिसांकडून चार आरोपींना अटक

याप्रकरणी परशुराम बाळू मेढेकर यांनी डोंबिवली पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मेढेकर यांच्या तक्रारीवरुन शाखा मॅनेजर सागर शंकर डोंगरे, संचालक राजेंद्र शंकरराव चोपडे, संचालक भास्कर कोंडाजी बिन्नर आणि संचालक विष्णु बाळू दिनकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तात्काळ कारवाई करत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.