तिघांवर पेट्रोल टाकून जाळणाऱ्यास पोलिसांनी घातल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

देवानंद मेश्राम यांचा घटनास्थळीच जळून मृत्यू झाला. आरती व जय हे ९० टक्के जळाल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

तिघांवर पेट्रोल टाकून जाळणाऱ्यास पोलिसांनी घातल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 2:26 PM

गोंदिया : शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत मोठी घटना घडली. यात जावयाने सासरा, पत्नी, मुलगा यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळ्याण्याचा प्रयत्न केला. यात सासऱ्याचा मृत्यू झाला. पत्नी व मुलावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी किशोर शेंडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सूर्याटोला येथे देवानंद मेश्राम (वय ५२ वर्ष), आरती किशोर शेंडे (वय ३५ वर्ष) व जय किशोर शेंडे (वय ४ वर्ष) हे रात्री झोपले होते. त्यावेळी आरोपी किशोर शेंडे (वय ४१ वर्ष) यांनी पेट्रोल टाकून या तिघांना जाळले. यामध्ये देवानंद मेश्राम यांचा घटनास्थळीच जळून मृत्यू झाला. आरती व जय हे ९० टक्के जळाल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आरोपी किशोर शेंडे याला भिवापूर, तिरोडा येथून पोलिसांनी अटक केली आहे. सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. रामनगर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद केला. आरोपीला अटक केली आहे. तपास रामनगर पोलीस करीत आहे.

ती करत होती रुग्णालयात काम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर शेंडे हा पत्नीला मारझोड करत होता. त्यामुळे पत्नी आरती वर्षभरापासून मुलासोबत माहेरी सूर्याटोला येथे राहत होती. उपजिवीकेसाठी ती एका खासगी रुग्णालयात काम करत होती. किशोर हा आरतीला परत नेण्यासाठी आला होता.

झोपलेल्या सासऱ्यावर पेट्रोल टाकले

रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले. देवानंद मेश्राम बाहेर अंगणात झोपले होते. पत्नी व मुलगा आतमध्ये खोलीत झोपले होते. किशोरने आधी सासऱ्याला पेट्रोल टाकून पेटविले. त्यानंतर पत्नी आणि मुलावरही पेट्रोल टाकून पेटविले. यात सासरे घटनास्थळी ठार झाले. तर पत्नी आणि मुलगी मृत्यूशी झुंज देत आहेत.

पत्नी आणि मुलगाही ९० टक्के भाजल्याचं सांगितलं जातं. घटनेनंतर किशोर फरार झाला. पण, पोलिसांनी त्याचा शोध घेतला. किशोरला अटक केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. घरगुती वादातून हे हत्याकांड घडले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.