23 हून अधिक फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात, बँकेत जाऊन लोकांना सांगायचा…
पोलिसांनी आरोपींकडून 22 रुपये जप्त केले आहेत. या आरोपीविरुद्ध मुंबई, ठाणे आणि गुजरातच्या विविध पोलीस ठाण्यात २३ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक, मालाड, शरद जाधव यांनी सांगितले.
मालाड : बँकेत पैसे जमा करण्यासाठी येणाऱ्या लोकांना पैसे देण्याचे आमिष दाखवून पैसे घेऊन फरार झालेल्या आरोपीला मुंबईतील मालाड पोलिसांनी (Mumbai malad police) अटक केली आहे. अब्बास सैफुद्दीन उकानी असे आरोपीचे नाव आहे. ती व्यक्ती गुजरातची (gujrat) रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर मुंबई, ठाणे आणि गुजरातच्या विविध पोलीस ठाण्यात (gujrat police) २३ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेतलेल्या इसमाची पोलिस कसून चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून आणखी गुन्ह्याची उखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. ती व्यक्ती एका वाईन शॉपमध्ये मॅनेजर असून दुसऱ्या दिवशी पैसे जमा करण्यासाठी दररोज बँकेत जातात. 18 तारीख रोजी मालाड मार्वे रोड येथील एचडीएफसी बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेले असता, त्यांना आरोपी सैफुद्दीन उकाणी हा आढळून आला. ज्याला फिर्यादीने ओळखले नाही. तरीही आरोपीने फिर्यादीला त्याच्या वाईन शॉपवर काम करणारे चार ते पाच लोकांची नावे सांगितले. त्याने नावाने ओळख सांगितली आणि विचारले की, तू त्यापैकी कोणाला ओळखतोस का? तेव्हा तक्रारदाराने सांगितले की, मी यादवला ओळखतो.
त्यानंतर आरोपीने सांगितले की, यादव यांनी आमच्या सरांना तुम्हाला पैसे देण्यास सांगितले आहे, असे म्हणत आरोपीने फिर्यादीला बँकेबाहेर नेले व समोर एक इमारत दाखवून सांगितले की, आमचे साहेब या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहतात. खाली आल्यावर तो तुला अडीच लाख रुपये देईल. एवढेच नाही तर फिर्यादीला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आरोपींनी आधी 50 हजार रोख दिले, त्यानंतर आरोपीने 50 हजार परत घेतले आणि आम्ही तुम्हाला अडीच लाख मिळून देतो. तुम्ही आधी तुमचे पैसे बँकेत जमा करा असे सांगितले.
तक्रारदार आपले पैसे जमा करण्यासाठी बँकेत गेले असता, आरोपी पुन्हा त्याच्याकडे आला आणि म्हणाला की, आमच्या सेठने तुमचे अडीच लाख रुपये काढले आहेत, तुम्ही आधी जाऊन पैसे घेऊन या, त्यानंतर लगेचच तक्रारदार बाहेर गेला असता आरोपीने 98 हजार रुपये असलेली बॅग घेऊन पळ काढला. मालाड पोलिसांनी सांगितले की, तक्रार आल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि काही पुराव्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर आरोपी दहिसर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि आरोपी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी आरोपींकडून 22 रुपये जप्त केले आहेत. या आरोपीविरुद्ध मुंबई, ठाणे आणि गुजरातच्या विविध पोलीस ठाण्यात २३ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक, मालाड, शरद जाधव यांनी सांगितले.