अमरावती : अमरावतीतील अचलपूर दंगलीप्रकरणी (Achalpur Violence)
सध्या अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच एक मोठी अपडेट समोर आलीय. अमरावतीच्या अचलपूर शहरात दोन गटांतील दगडफेक आणि हाणामारीच्या प्रकरणात आरोपींची कोठडी आता वढवण्यात आलीय. दगडफेक प्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही गटातील 24 आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देत न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. अचलपूरच्या न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागीतलेली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. तर दंगलीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडत आहेत. मंत्री यशमोती ठाकूर (Yashomati Thakur) या यामागील मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावरही अनेक गंभीर आरोप होत आहेत.
अमरावतीच्या अचलपूर मधील दोन गटांतील हाणामारी प्रकरणात आता प्रशासनाकडूनही नवे आदेश काढण्यात आले आहेत. अचलपूर परतवाडा शहर व अन्य दोन गावात सुरू असलेल्या संचार बंदीत दैनंदिन गरजा अत्यावश्यक सेवेसाठी आता सायंकाळी 6 ते रात्री 8-30 वाजेपर्यंत मुभा असणार असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर रात्री अडीच तास नागरिकांना खरेदीसाठी आता बाहेर पडता येणार आहे. उपविभागीय दंडाधिकारी संदीप कुमार अपार यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
मंत्री अनिल बोंडे यांनी या दंगलीमागे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नसून यशमोती ठाकूर असल्याचा आरोप केला आहे. तर काँग्रेसचे दिलीप एडतकर यांनी भाजप नेते अनिल बोंडे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेच मास्टर माईंड आहेत, असा आरोप काँग्रेसच्या प्रवक्तत्यांनी केल्याने यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. अनिल बोंडे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत. अशी घणाघाती टीकाही योशमती ठाकूर यांनी केली आहे, तसे अनिल बोंडेंचा अमरावतीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा राजकीय वाद काही केल्या शांत होईना, ही घटना संपल्यापासून हे आरोप प्रत्यारोप रोज सुरू आहेत. तर आता आरोपींच्या अडचणीतही कोठडी मुक्काम वाढल्याने मोठी वाढ झाली आहे. यांच्या अडचणी आणखी किती वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Jayant Patil: आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही, मंत्री नंतर आधी कार्यकर्ता: जयंत पाटील