नाशिक : नाशिकच्या मनमाड रेल्वेस्थानकावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात एका माथेफिरुने ॲसिडने हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटणेने रेल्वे वर्तुळात खळबळ उडाली आहे. अचानक हा सर्व प्रकार समोर आल्याने रेल्वे स्थानकावर भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या माथेफिरुने केलेल्या हल्ल्यात दोन प्रवासी आणि दोन आरपीएफ जवान किरकोळ जखमी झाले होते. पवन एक्सप्रेसच्या वातानुकीलीत डब्यात हा सर्व प्रकार घडल्याने रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा समोर आला असून माथेफिरुवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात असून अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी अशी मागणी देखील प्रवासी संघटना करू लागल्या आहेत.
मुंबईवरुन निघणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या डब्यात एक माथेफिरु शिरला होता, त्याने एसी डब्यात धुमाकूळ घालण्यात सुरुवात केली होती.
माथेफिरु जोरजोरात ओरडून शिवीगाळ करत होता, प्रवाशांनी त्याला हटकावन्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील माथेफिरु प्रवाशांना त्रास होईल असे कृत्य करतच होता.
रेल्वेने प्रवास करत असतांना काही प्रवाशांनी आरपीएफ जवानांना ही बाब कळवली होती, लागलीच आरपीएफ जवान एसी डब्यात दाखल झाले होते.
सावध असलेल्या माथेफिरुने त्याच्याकडे असलेल्या ॲसिड जोरात जवानांच्या दिशेन फेकले होते, यामध्ये दोन प्रवासी आणि दोन आरपीएफ जवान जखमी झाले आहेत.
लागलीच त्याने रेल्वेच्या शौचलयात स्वतःला कोंडून घेतले होते, त्यामध्ये रेल्वे पोलीस त्याला बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र बाहेर येत नसल्याने दरवाज्या तोडून त्याला बाहेर काढले होते.
या माथेफिरुला रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेत मनमाड पोलीसांच्या हवाली केले आहेत, त्याच्याकडे ॲसिड कुठून आले? रेल्वेत बसून तो कुठे जात होता याबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे.
माथेफिरूचे नाव धनेशवर यादव असून तो भागलपूरचा आहे. माथेफिरुने हे कृत्य का केलं? याचाही शोध रेल्वे पोलीस निरीक्षक जोगदंड तपास करत आहेत.