Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karad Action : पाटण सडा वाघापूर पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्या 62 जणांवर कारवाई

सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील पाटण तारळे रस्त्यावरील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत.

Karad Action : पाटण सडा वाघापूर पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्या 62 जणांवर कारवाई
पाटण सडा वाघापूर पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्या 62 जणांवर कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 8:49 PM

कराड : पाटण सडा वाघापर पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्या 62 जणांवर पाटण पोलिसांनी कारवाई (Action) केली आहे. उलटा धबधबा (Waterfall) पाहण्यासाठी आलेल्या व पठारावर अनेक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या 62 जणांसह अनेक वाहनां (Vehicles)वरही कारवाई केली आहे. यामध्ये 22 हुल्लडबाज तर 40 वाहनधारकांचा समावेश आहे. विस्तीर्ण सडा वाघापूर पठारावर साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त असून, यामुळे पर्यटन स्थळावरील हुल्लडबाजीला चाप बसणार आहे. पावसाळी पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक या उलट्या धबधब्यावर येतात.

सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील पाटण तारळे रस्त्यावरील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी ही संख्या वाढली असून सुट्टी दिवशी तब्बल चार ते पाच हजार पर्यटक सडा वाघापूरला हजेरी लावतात.

कारवाईत 22 हुल्लडबाज तर 40 वाहनधारकांचा समावेश

दरम्यान, या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या युवा तरुणाईचा मोठा भरणा आहे. रस्त्यावर नाचणे पठारावर हॉर्न वाजवत गाड्या फिरवणे, गाडीतील टेप रेकॉर्डर लावून धिंगाणा घालणे, या प्रकारची हुल्लडबाजी सडा वाघापूरला मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सडा वाघापूरला तब्बल 62 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 22 हुल्लडबाज तर 40 वाहनधारकांचा समावेश आहे. पाटण पोलिसांच्या वतीने या हुल्लडबाजांवर आता करडी नजर राहणार असून पाटण पोलीसांच्या वतीने सडा वाघापूर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. याबरोबरच पोलिसांची गस्तही सुरू राहणार असून याद्वारे हुल्लडबाजांवर अंकुश ठेवण्यात येईल अशी माहिती पाटण पोलीस ठाण्याचे पीआय चौखंडे यांनी दिली. दरम्यान हुल्लडबाज युवकांनी आपल्या हुल्लडबाजीने पर्यटन स्थळाला गालबोट लावू नये असे आवाहन चौखंडे यांनी केले आहे. (Action taken against 62 people who rioted on Patan Sada Waghapur Waterfall)

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....