हिरोईन आहे की पक्की चोर? बयेनं चोरीचा हिशेबही लिहून ठेवलाय, अभिनेत्री रुपा दत्ताचे एकसे एक कारनामे

अभिनेत्री रुपा दत्ता शनिवारी पुस्तक प्रदर्शनाच्या मैदानात डस्ट बिनमध्ये काही मनीबॅग टाकताना आढळली होती. तिच्या हालचालींवरुन पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या बॅगमधून अनेक बॅग जप्त करून तिला अटक केली.

हिरोईन आहे की पक्की चोर? बयेनं चोरीचा हिशेबही लिहून ठेवलाय, अभिनेत्री रुपा दत्ताचे एकसे एक कारनामे
अभिनेत्री रुपा दत्ताImage Credit source: इन्स्टाग्राम
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 8:42 AM

कोलकाता : एकेकाळी प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याच्यावर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप करणारी अभिनेत्री रुपा दत्ता (Rupa Dutta) अडचणीत आली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात खिसा कापल्याच्या आरोपाखाली (pickpocketing) रुपाला कोलकाता येथे अटक करण्यात आली आहे. पोलिसांना रुपाच्या बॅगमध्ये 65 हजार 760 रुपये सापडले, ज्याबद्दल ती कोणतंही समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. चौकशी केली असता, तिने पुस्तक प्रदर्शनातील गर्दीत खिसे कापल्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे आपण हे पहिल्यांदाच केलं नसल्याचंही तिने सांगितलं. पोलिसांना तिच्या बॅगेत एक डायरी देखील सापडली आहे. ही डायरी तिने चोरीचा हिशोब ठेवण्यासाठी वापरली होती.

रुपाकडे सापडलेल्या डायरीत कोलकात्यातील काही गर्दीच्या ठिकाणांची नावे आहेत. ही नावं कदाचित रुपा सामान्यपणे टार्गेट करत असेल, असं हिंदुस्थान टाईम्सच्या अहवालात म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

अभिनेत्री रुपा दत्ता शनिवारी पुस्तक प्रदर्शनाच्या मैदानात डस्ट बिनमध्ये काही मनीबॅग टाकताना आढळली होती. तिच्या हालचालींवरुन पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या बॅगमधून अनेक बॅग जप्त करून तिला अटक केली.

बॅगमध्ये 65 हजार सापडले

पोलिसांना रुपाच्या बॅगमध्ये 65 हजार 760 रुपये सापडले. त्याबद्दल विचारणा केली असता ती पोलिसांना समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. अखेर तिने पुस्तक प्रदर्शनातील गर्दीत खिसे कापल्याची कबुली दिली.

डायरीत चोरीच्या नोंदी

पोलिसांना तिच्या बॅगेत एक डायरी सापडली आहे. ही डायरी तिने चोरीच्या नोंदी ठेवण्यासाठी वापरली होती. कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात खिसा कापल्याच्या आरोपाखाली रुपाला कोलकाता येथे अटक करण्यात आली आहे.

अनुराग कश्यपवर आरोप

याआधी रूपा दत्ता चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्यामुळे चर्चेत आली होती. रूपा दत्ताने अनुराग कश्यपवर केवळ लैंगिक छळाचाच नव्हे तर ड्रग्ज घेण्याचाही आरोप केला होता. यासोबतच अनुरागला कठोर शिक्षा करण्याची मागणीही तिने एनसीबीकडे केली होती.

संबंधित बातम्या :

आधी कॅमेऱ्यावर फवारला काळा स्प्रे नंतर गॅस कटरने फोडले एटीएम! यवतमाळात एकाच रात्री दोन ठिकाणी चोऱ्या

बाईक चोरल्याचा संशय, मुंबईत 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांनी छळल्याचा कुटुंबाचा आरोप

चोरी करायला आलेल्या तरुणाचा मृत्यू, साथीदारही बघत राहिले, अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.